Pro Kabaddi League 2024 : तमिळ थलैवाजाने रोखली पुणेरी पलटणची विजयी घोडदौड…

Pro Kabaddi League 2024 (Tamil Thalaivas vs Puneri Paltan) : तमिळ थलैवाजने गतविजेत्या पुणेरी पलटनचा पराभव करून दमदार विजय मिळवला आहे. तमिळ थलैवाजने पुणेरी पलटनचा अवघ्या 5 गुणांच्या फरकाने पराभव केला. यासह पुणेरी पलटणला सीझन 11 मध्ये पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्याचबरोबर तमिळ थलैवाजने सलग दुसरा सामना जिंकला आहे.
சும்மா 🔥 ஆட்டம், என்ன மக்களே சந்தோஷமா?#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar @TamilThalaivas pic.twitter.com/k1TZlkk1er
— ProKabaddi (@ProKabaddi) October 23, 2024
आज झालेल्या चुरशीच्या लढतीत तमिळ थलैवाजने पुणेरी पलटण संघाला 35-30 असे पराभूत करताना 11 व्या प्रो कबड्डी लीगमध्ये आपली आगेकूच कायम राखली. गच्चीबोवली येथील मैदानावर झालेल्या सामन्यात चढाईमध्ये नरेंद्र होशियारने 9 तर सचिनने 6 गुणांची कमाई केली. त्यांना नितेशकुमारने 5, साहिल सिंगने 3 तर अमीर हूसैन बस्तनीने 2 पकडी करताना सुरेख साथ दिली.
Pro Kabaddi League 2024 : अर्जुन देशवालची धडाकेबाज कामगिरी, पिंक पँथरची टायटन्सवर एकतर्फी मात…
तमिळ थलैवाजने चढाईतून 17 गुण, पकडीतून 13 गुण तर 4 गुण लोण चढवून मिळविले. पुणेरी पलटणच्या मोहित गोयतने 13 गुण मिळविताना लढत देण्याचा प्रयत्न केला. त्याला अबीनेश नदराजनने 2 पकडी व 2 बोनस घेवून साथ देण्याचा प्रयत्न केला.





