Pro Kabaddi 2024 ( Puneri Paltan vs Telugu Titans) | प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League 2024) च्या 124 व्या सामन्यात तेलुगू टायटन्सने पुणेरी पलटणचा 48-36 असा पराभव केला. टायटन्सचा हा 12वा विजय असून 66 गुणांसह ते सातव्या स्थानावर आहेत. पुणेरी पलटण 55 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. टायटन्सचा हा शेवटचा साखळी सामना होता.
తియ్యండ్రా బళ్ళు!! 🤩
తిప్పండ్రా మీసాలు!! 😎టైటాన్స్ కలిసి కట్టుగా ఇరగదీసారు 🔥
గెలిచారు 🥹✊🏻#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #PuneriPaltan #TeluguTitans pic.twitter.com/5VvVJjglS9— ProKabaddi (@ProKabaddi) December 20, 2024
या सामन्यात तेलुगू टायटन्ससाठी पवन सेहरावतने सर्वाधिक 14 रेड पॉइंट घेतले आणि अंकितने 6 टॅकल पॉइंट घेतले. पुणेरी पलटणसाठी व्ही अजित कुमारने 9 रेड पॉइंट घेतले आणि बचावात अमनने 4 टॅकल पॉइंट घेतले.
तेलुगु टायटन्सचे आव्हान जवळपास संपुष्टात..
तेलुगू टायटन्सने जरी हा सामना जिंकला असेल आणि शानदारपणे लीग स्टेजचा शेवट केला असेल, तरी ते प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडले आहेत. त्यांना पुढच्या फेरीत जायचे असेल, तर यू मुंबाला त्यांचे उर्वरित दोन्ही सामने 64 गुणांच्या फरकाने गमवावे लागतील, जे खूप कठीण वाटते.