Pro Kabaddi League 2024 (Eliminator 1) | यूपी योद्धाजची उपांत्य फेरीत दणक्यात एन्ट्री, जयपूर पिंक पँथर्सचा केला लाजीरवाणा पराभव…

Pro Kabaddi League 2024 (Eliminator 1 : UP Yoddhas vs Jaipur Pink Panthers) – यूपी योद्धाजचा संघ प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामात उपांत्य फेरीत पोहोचला आहे. गुरुवारी झालेल्या एलिमिनेटर सामन्यात यूपी योद्धाजने जयपूर पिंक पँथर्सचा 46-18 असा पराभव केला.
योद्धाज़ ने पैंथर्स को दी करारी शिकस्त 💪🔥
लगातार 10वें मैच में अपराजित रहते हुए सेमीफाइनल में की धमाकेदार एंट्री 💙 #ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #PKLPlayoffs #UPYoddhas #JaipurPinkPanthers pic.twitter.com/ZYuZxxN43U
— ProKabaddi (@ProKabaddi) December 26, 2024
अशाप्रकारे यूपीच्या संघाने तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत धडक मारली असून दोन वेळच्या चॅम्पियन जयपूरला मोठा धक्का बसला आहे. सामन्यात जयपूर पिंक पँथर्सचे रेडर्स आणि डिफेंडर्स दोन्हीही पूर्णपणे अपयशी ठरले.
या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने यूपी योद्धाज कोणतीही चुरशीची लढत दिली नाही आणि हा पहिला एलिमिनेटर सामना पूर्णपणे एकतर्फी असा झाला. जयपूरने पराभवाचे अंतर नक्कीच कमी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना लाजिरवाण्या पराभवापासून वाचवता आले नाही आणि अशाप्रकारे यूपी योद्धाजनी हा सामना सहज जिंकून उपांत्य फेरीत धडक मारली. आता पहिल्या उपांत्य फेरीत यूपी योद्धाज यांचा सामना हरियाणा स्टीलर्सशी होणार आहे.
यूपी योद्धाजसाठी भवानी राजपूतने चमकदार कामगिरी केली आणि हितेश आणि सुमितनेही बचावात चांगली कामगिरी करत साथ दिली. याच कारणामुळे संघाने जयपूर पिंक पँथर्सचा एकतर्फी पराभव केला. यूपी योद्धाजसाठी या सामन्यात भवानी राजपूतने सर्वाधिक 12 रेड पॉइंट घेतले. सुमित आणि हितेश यांनी बचावात हाई 5 गुण घेतले. तर दुसरीकडे जयपूर पिंक पँथर्ससाठी रजा मिरबाघेरीने सर्वाधिक 5 गुण घेतले.





