Pro Kabaddi 2024 (Puneri Paltan Vs Bengaluru Bulls) : प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामात बेंगळुरू बुल्सला पुन्हा एकदा लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यावेळी त्यांचा पुणेरी पलटणकडून 38 गुणांच्या मोठ्या फरकाने पराभव झाला आहे. पुणेरी पलटणने बेंगळुरू बुल्सचा 56-18 असा पराभव केला.
मटकीला मोड नाही, तुळशीबागेला जोड नाही आणि पुणेरी पलटनच्या खेळाला तोड नाही! 🔥🧡#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #PuneriPaltan #BengaluruBulls pic.twitter.com/8hmEqbe18q
— ProKabaddi (@ProKabaddi) December 13, 2024
पुणेरी पलटणसाठी कर्णधार आकाश शिंदे, मोहित गोयत, गौरव खत्री आणि अमन यांनी या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. संघाकडून आकाश शिंदे आणि मोहित गोयत यांनी 8-8 गुण घेतले. गौरव खत्रीने 6 आणि अमनने 5 टॅकल पॉइंट घेतले.
या विजयासह पुणेरी पलटण आता प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. सर्वोत्कृष्ट गोष्ट अशी आहे की, त्यांनी त्यांच्या स्कोअरचा फरक चांगला सुधारला आहे जो भविष्यात खूप उपयुक्त ठरू शकतो.
पुणेरी पलटण संघाने पहिल्या 10 मिनिटांतच बेंगळुरू बुल्सला ऑलआऊट केले आणि त्यामुळे त्यांची आघाडी मोठी झाली. पूर्वार्ध संपूर्णपणे पुणेरी पलटणच्या नावावर होता.
पूर्वार्धातच पुणेरी पलटणने बेंगळुरू बुल्सला दोनदा ऑलआऊट केले. बेंगळुरू संघाच्या तीन खेळाडूंना पूर्वार्धात गुणाचं खातेही उघडता आले नाही. या कारणास्तव पूर्वार्ध पुणेरी पलटणच्या बाजूने 26-7 असा होता.
Pro Kabaddi 2024 (Match 109) | तमिळ थलैवाजची झुंज अपयशी, पाटणा पायरेट्सनं 4 गुणांनी मारली बाजी….
उत्तरार्धाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा बेंगळुरू बुल्स संघ सर्वबाद झाला. यामुळे तो स्पर्धेत खूप मागे पडला आणि त्याला पुनरागमन करणे खूप कठीण झाले. जसजसा सामना पुढे जात होता, तसतसा बेंगळुरू बुल्स संघ खूप मागे पडत होता. रेडर्स किंवा डिफेंडर्स या दोघांनाही अपेक्षित कामगिरी करता आली नाही. यामुळे बेंगळुरू बुल्सला या मोसमातील सर्वात मोठा पराभव किंवा PKL इतिहासातील कदाचित सर्वात मोठा पराभव पत्करावा लागला.