Priyanka Gandhi : मोदींनी कॅमेऱ्याचा नव्हे; हृदयाचा ॲंगल बदलावा : प्रियंका गांधी
Priyanka Gandhi :

Priyanka Gandhi : शिक्षण व्यवस्था, परीक्षांमधील गोंधळ, विद्यार्थी आंदोलकांवरील कारवाई आदी मुद्द्यांवरून कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मंगळवारी केंद्र सरकारवर जोरदार शाब्दिक तोफ डागली. (Priyanka Gandhi)
विद्यार्थी आंदोलकांपर्यंत पोहचण्यासाठी इन्स्टाग्रामचा वापर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी उपरोधिक सल्ला दिला. जेन झीची मनं जिंकण्यासाठी मोदींनी कॅमेऱ्याचा नव्हे; हृदयाचा ॲंगल बदलावा, असे त्या म्हणाल्या. (Priyanka Gandhi)
लोकसभेत पेपरफुटी विरोधातील सुधारणा विधेयकावर चर्चा झाली. त्यामध्ये सहभागी होत प्रियंका यांनी सरकारला धारेवर धरले. त्यांच्या टीकेचा रोख प्रामुख्याने मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर होता. (Priyanka Gandhi)
प्रल्हाद जोशींबाबात आक्षेपार्ह विधान
लोकसभेत भाषण करताना खासदार प्रियंका गांधी यांनी म्हटले की, पंतप्रधानांनी नव्या शिक्षण मंत्रिपदी अशा व्यक्तीची निवड केली आहे, ज्यांनी गर्भवती बलात्कार पीडितेच्या दोषींना मुक्त करण्यास सहमती दिली होती. (Priyanka Gandhi)
या विधानानंतर लोकसभा सभापतींनी त्यांना रोखले आणि सत्ताधारी सदस्यांनी जोरदार गदारोळ केला. यावर प्रियंका गांधी यांनी वृत्तपत्रांमध्ये असं छापलेले आहे असं म्हटलं. यानंतर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या विधानावर आक्षेप घेत, प्रियंका गांधी यांची टिप्पणी ही एका प्रकारचे चारित्र्यहनन आहे. (Priyanka Gandhi)
अशा भाषेची अपेक्षा नाही. हे वक्तव्य सभागृहाच्या नोंदीतून हटवावे. संसदेतील चर्चेची पातळी खालावू नये. जबाबदारीने बोलले पाहिजे. जर त्या पुरावे देऊ शकत नसतील तर त्यांनी माफी मागावी. (Priyanka Gandhi)
Priyanka Gandhi : त्रुटींवर चर्चा करण्यास केंद्राची टाळाटाळ; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका






