Political News : मोठी बातमी! आमदार निवासाच्या 7व्या मजल्यावरून पडून भाजपच्या माजी मंत्र्यांचा मृत्यू; राजकीय वर्तुळात खळबळ
Political News : राजकीय वर्तुळातून एक अतिशय धक्कादायक आणि सुन्न करणारी बातमी समोर आली आहे.

Political News : उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळातून धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री नानक राम भुर्जी यांचा आमदार निवासाच्या इमारतीवरून पडून मृत्यू झाला. ही घटना लखनऊतील हजरतगंज परिसरातील ‘दारुलशफा’ नवीन आमदार निवास संकुलात घडली असून, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Political News)
वृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार, 68 वर्षीय नानक राम भुर्जी हे आमदार निवास संकुलाच्या सातव्या मजल्यावरून खाली पडले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. (Political News)
पोलीसांनी भुर्जी यांना तात्काळ सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली. (Political News)
या प्रकरणी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, नेमका अपघात कसा घडला याचा तपास पोलीस करत आहेत. अद्याप या घटनेमागील कारण स्पष्ट झालेले नाही. (Political News)

Political News : मोठी बातमी! आमदार निवासाच्या 7व्या मजल्यावरून पडून भाजपच्या माजी मंत्र्यांचा मृत्यू राजकीय वर्तुळात खळबळ
दरम्यान, माजी मंत्री नानक राम भुर्जी यांच्या निधनाची बातमी समजताच उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून, विविध राजकीय नेत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. (Political News)
Political News : तृणमूलचे बंडखोर खासदार भाजपमध्ये होणार विलीन? सुवेंदू अधिकारी भेट घेण्याची शक्यता
Political News : दुःखद बातमी..! एकाच दिवशी दोन दिग्गज नेत्यांचे निधन; राजकीय वर्तुळात हळहळ





