Pune : अपघात कमी करण्यास प्राधान्य – अर्चना गायकवाड

पुणे – शहरासह पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य राहील. त्यामध्ये अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती पुण्याच्या नवनियुक्त प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) अर्चना गायकवाड यांनी शुक्रवारी (दि. 14) दिली.
पुणे आरटीओच्या पदाचा कार्यभार अर्चना गायकवाड यांनी शुक्रवारी घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाटील म्हणाल्या, की पुण्यात काम करताना पहिले रस्ता सुरक्षेला प्राधान्य राहणार आहे. अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
शहरातील काही शाळा सुरू झाल्या आहेत. तर, पुढील आठवड्यामध्ये काही शाळा सुरू होत आहेत. त्यामुळे स्कूल व्हॅनचे पासिंग, त्यांची तपासणी याकडे लक्ष दिले जाणार आहे. सुरक्षित विद्यार्थी वाहतूकीसाठी काम केले जाणार आहे. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम प्रयत्न केले जातील.





