डोकं लावले अन् लाखो छापले! महाकुंभमेळ्यात ‘हा’ तरूण भाविकांना घडवतोय चक्क ‘डिजिटल स्नान’

Mahakumbh 2025 : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 144 वर्षानंतर आलेल्या महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी प्रयागराज येथे कोट्यावधी भाविक उपस्थित राहत आहेत. आतापर्यंत 50 कोटींपेक्षा अधिक भाविकांनी या धार्मिक सोहळ्यात पवित्र स्नान केले. असेही लाखो लोकं आहेत, ज्यांना विविध कारणांमुळे महाकुंभला जाता आले नाही. मात्र, स्वतः प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नसले तरीही चक्क डिजिटल माध्यमातून पवित्र स्नान केले जात आहे.
विमान-रेल्वे तिकीट न मिळणे, महामार्गावर प्रचंड गर्दी, आरोग्य अशा विविध कारणांमुळे अनेकांना महाकुंभला जाणे शक्य होत नाहीये. मात्र, आता यावर उपाय म्हणून हटके ऑनलाइन पद्धत शोधण्यात आली आहे. महाकुंभला प्रत्यक्ष उपस्थित न राहता , डिजिटल स्नान करता येत आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये एक व्यक्ती दावा करत आहे की, केवळ 1100 रुपये शुल्क भरून डिजिटल स्नान सेवा उपलब्ध आहे. यासाठी भाविक व्हॉट्सअॅपद्वारे स्वतःचे फोटो पाठवतात. त्यानंतर त्यांचे फोटो नदीत विसर्जित केला जातात. अशाप्रकारे, त्यांच्या आत्म्याला शुद्ध करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
View this post on Instagram
दीपक गोयल नावाच्या व्यक्तीने सांगितले की, तो प्रयागराजचा आहे व नियमितपणे संगमकडे जात असतो. त्याने सांगितले की, तो पैसे पाठवल्यानंतर 24 तासांच्या आत भाविकांची छायाचित्रे घेऊन संगमकडे जातो व तेथे त्यांना पत्रिव स्नान घडवून आणले जाते.
सोशल मीडियावर या पवित्र डिजिटल स्नानाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. काही सोशल मीडिया यूजर्स अशाप्रकारे भाविकांच्या साधेपणा व धार्मिक विश्वासाचा फायदा घेऊन फसवणूक केली जात असल्याचे म्हणत आहेत. तर काही यूजर्स अशाप्रकारच्या हटके व्यवसायाचे कौतुकही करत आहेत.





