prajakta gaikwad : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या लोकप्रिय मालिकेमध्ये येसूबाईची भूमिका साकारणारी अभिनेत्री, प्राजक्ता गायकवाड लवकरच लग्नबंधनात अडकणार

prajakta gaikwad : लोकप्रिय मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मध्ये महाराणी येसूबाईची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या चाहत्यांना लग्नाची खुशखबर दिली होती, आणि आता तिने लग्नाची तारीख आणि शुभ मुहूर्तही जाहीर केला आहे.
प्राजक्तानं तिच्या सोशल मीडियावर लग्नपत्रिकेचा व्हिडीओ शेअर केला आहे. पत्रिकेवरून कळतं की, प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराज खुटवड यांचं लग्न २ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजून २४ मिनिटांवर पार पडणार आहे. पत्रिकेच्या आजूबाजूला हळद-कुंकू, अक्षता, गुलाबाच्या पाकळ्या आणि मोराचे पिस यांसारखी पारंपरिक सजावट पाहायला मिळते.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने पारंपरिक पोशाखात काही फोटो शेअर केले होते, ज्यामुळे चाहत्यांमध्ये लग्नाबाबत उत्सुकता वाढली होती. तसेच ७ ऑगस्ट २०२५ रोजी प्राजक्ताचा साखरपुडा पार पडला, ज्याचे काही खास क्षण तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंतून शंभुराज खुटवड यांचा चेहराही पहिल्यांदा चाहत्यांसमोर आला होता.
चाहत्यांनी या व्हिडीओखाली प्राजक्ताला आणि शंभुराजला शुभेच्छा दिल्या आहेत. प्राजक्ता आणि शंभुराज लवकरच विवाहबंधनात अडकून त्यांच्या प्रेमाची नवीन सुरुवात करणार आहेत.





