Prajakta gaikwad : तब्बल ५ वर्षांनंतर प्राजक्ता गायकवाडचं रुपेरी पडद्यावर होणार कमबॅक; स्वतः दिली माहिती…
अभिनेत्री 'प्राजक्ता गायकवाड' तब्बल पाच वर्षांनंतर मालिकाविश्वात पुनरागमन करत आहे. या मालिकेत ती प्राजक्ता कुलकर्णी ही महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

Prajakta gaikwad : मराठी अभिनेत्री ‘प्राजक्ता गायकवाड‘ तब्बल पाच वर्षांनंतर मालिकाविश्वात पुनरागमन करत आहे. या मालिकेत ती प्राजक्ता कुलकर्णी ही महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
भूमिकेबद्दल बोलताना प्राजक्ता म्हणते की, ‘ही व्यक्तिरेखा तिच्यासाठी अत्यंत वेगळी आणि भावनिक आहे. लहान वयातच आई-वडिलांचं छत्र हरवलेल्या प्राजक्ताचा सांभाळ तिच्या मामांनी केला आहे. त्यामुळे तिच्यासाठी मामा-मामी हे देवासमान आहेत. Prajakta gaikwad
ती पुढे सांगते की, तिचं संपूर्ण आयुष्य वैद्य कुटुंबाभोवती केंद्रित आहे. कुटुंबाच्या आनंदासाठी ती कोणतीही मर्यादा ओलांडू शकते
ही भूमिका तिच्या आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा अधिक भावनिक आणि खोल आहे.
टीव्ही माध्यमाबद्दल बोलताना ती सांगते की प्रेक्षकांशी थेट जोडले जाण्याची संधी या माध्यमातून मिळते, आणि त्यामुळे ती खूप उत्साहित आहे. या काळात तिने मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपट तसेच जाहिरातींमध्येही काम करून आपली कारकीर्द पुढे नेली. Prajakta gaikwad

Prajakta gaikwad : तब्बल ५ वर्षांनंतर प्राजक्ता गायकवाडचं रुपेरी पडद्यावर होणार कमबॅक; स्वतः दिली माहिती…
तसेच, अभिनेत्री गौरी इंगवले हिच्यासाठी ‘पाठराखीण’ ही मालिकाविश्वातील मोठी संधी ठरत आहे. याआधी तिने चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली असून आता ती पहिल्यांदाच मालिकाविश्वात पाऊल ठेवत आहे. Prajakta gaikwad
दरम्यान, ‘पाठराखीण’ ही मालिका केवळ दोन बहिणींच्या कथेत मर्यादित नाही, तर ती कौटुंबिक नात्यांची खोली दाखवणारी कहाणी आहे. बहिणींच्या नात्याचं भावनिक चित्रण आणि संघर्ष, प्रेम यांचा समतोल पाहायला मिळणार आहे. तसेच नवीन आणि अनुभवी कलाकारांचा प्रभावी संगम देखील प्रेक्षकांसाठी चांगला ठरणार आहे.
‘पाठराखीण’ मालिकेत दाखवलेलं कथानक केवळ मनोरंजनापुरतं मर्यादित नसून, ते प्रत्येक घरातील नात्यांची ओळख करून देणारं आहे. ही मालिका प्रेक्षकांना भावनिक आणि विचारप्रवृत्त करणारा अनुभव देणार आहे. प्राजक्ता गायकवाडचं पुनरागमन आणि गौरी इंगवलेची नव्या प्रवासाची सुरुवात यामुळे मालिकेची उत्सुकता अधिक वाढली आहे.
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिचं २ डिसेंबर २०२५ रोजी पुण्यात लग्न झालं. शंभुराज खुटवडसोबत तिनं लग्नगाठ बांधली. पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या लग्नसोहळ्याची त्या वेळी खूप चर्चा झाली होती. मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणाऱ्या प्राजक्ताच्या खऱ्या आयुष्यातही शंभूराज आल्याने तिच्या चाहत्यांना आनंद झाला.





