‘हे फार चुकीचं, आपल्याच देवांची मस्करी…’; प्राजक्ता आणि शंभूराजच्या ग्रँड एन्ट्रीवर नेटकरी नाराज

Prajakta Gaikwad-Shambhuraj Khutwad | मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार मंडळी विवाहबंधनात अडकत आहे. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनेही शंभूराज खुटवड यांच्याशी आपली लग्नगाठ बांधली. त्यांच्या शाहीविवाह सोहळ्याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. या जोडप्याने एन्ट्री अविस्मरणीय आणि रॉयल होती. मात्र या एण्ट्रीमुळे प्राजक्ताला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.
प्राजक्ता आणि शंभूराजनं एका अवाढव्य अशा नंदीवर बसून रिसेप्शनच्या ठिकाणी ग्रँड एन्ट्री घेतली. नंदी येताच आसमंतात रंगीबेरंगी फटाक्यांची आतिषबाजी झाली आणि संपूर्ण वातावरण एखाद्या ऐतिहासिक चित्रपटासारखं झालं. हा व्हिडीओ काही तासांतच व्हायरल झाला. Prajakta Gaikwad-Shambhuraj Khutwad |
ट्रोल होण्याचे कारण काय?
परंतु ज्या नंदीवर प्राजक्ता आणि शंभुराज बसलेले, त्या भव्य नंदीच्या पुढे भगवान शंकर चालत होते. ते पाहून चाहत्यांचा हिरमोड झाला आणि अनेकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, अनेक चाहत्यांनी भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. “हे फार चुकीचं आहे आपल्याच देवांची मस्करी आहे ही आणि असं स्वतःला श्रेष्ठ ठरवलंय, काय बोलायचं…”, “काय प्रकार आहे हा?”, अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. Prajakta Gaikwad-Shambhuraj Khutwad |
View this post on Instagram
प्राजक्ताचा पारंपरिक महाराणी लूक
लग्नात हिरव्या नऊवारीतील पारंपरिक महाराणी लूकमध्ये दिसलेली प्राजक्ता रिसेप्शनसाठी लाल रंगाची अतिशय सुंदर भरजरी साडी नेसून आली होती. सोनेरी जरीच्या नाजूक नक्षीकामाने खुललेली ही साडी आणि त्याला साजेशी नथ, मोत्यांचे दागिने यामुळे ती खरंच ‘लाल परी’ वाटत होती. शंभुराज यांनीही शेडची शेरवानी घातली होती. दोघांच्या या खास लुकला अनेकांनी पसंतीही दिली. मात्र त्यांच्या आगळवेगळ्या एन्ट्रीवर टीका केली जात आहे.
दरम्यान, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील येसूबाईंच्या भूमिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर शंभूराज खुटवड हे एक यशस्वी उद्योगपती आणि पैलवान आहे.
हेही वाचा:





