मुंबई – “स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज’ मालिकेत महाराणी येसूबाई राणीसाहेबांची भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री ‘प्राजक्ता गायकवाड’ आपल्या उत्तम अभिनयामुळे महाराष्ट्रातील घराघरात पोचली आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून, ती नेहमीच इंस्टाग्रामवर आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
सध्या प्राजक्ताची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. त्याच कारण देखील तितकंच खास आहे. नुकतंच अभिनेत्रीने आपलं पदवीच शिक्षण पूर्ण केलं आहे. स्वतः प्राजक्ताने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत या बद्दल माहिती दिली आहे.
येसूबाईंच्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या प्राजक्ताने इंजिनिअरिंग पूर्ण केलं आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आणि फक्त उत्तीर्णच नाही केली तर फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मिळवलं आहे.
तिने पुण्याच्या सावित्रीबाई फुले युनिव्हर्ससिटीमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. प्राजक्ताच्या या पोस्टवर चाहते कमेंट्स करत तिचं अभिनंदन करत आहेत.
फोटो शेअर करत प्राजक्ताने लिहिलं आहे,”फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची परीक्षा उत्तीर्ण. 10 पैकी ग्रेड आहे 8.77. आता अखेर मी इंजिनिअर अभिनेत्री झाले..!’ अशी पोस्ट तिने शेअर केली आहे.