‘प्रहार’चे छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर महामार्गावरील नेवासा फाटा येथे रास्ता रोको आंदोलन

नेवासा : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शेतकऱ्यांचे तारणहार बच्चुभाऊ कडू यांनी शेतकरी कर्जमाफी व दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळविण्याच्या मागणीसाठी ८ तारखेपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. आज आंदोलनाच्या सहाव्या दिवशी आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. तत्पर्वी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगर -अहिल्यानगर महामार्गावरील नेवासा फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले.
यावेळी अॅड.पांडूरंग औताडे बोलत होते पोलीस प्रशासनाने आंदोलकांच्या माइकची वायर काढून धरपकड करून प्रहारचे युवक जिल्हाध्यक्ष अॅड.पांडुरंग औताडे यांना रस्त्याच्या बाजूला ओढले यावेळी आंदोलनस्थळी वातावरण तणाव पूर्ण झालेले होते. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासन व शेतकरी यांच्यामध्ये समन्वय ठेवून आंदोलन सुरू ठेवलेले होते.
यावेळी आंदोलकांनी संभाजीनगर – शेवगांव येथील राजमुद्रा चौकात बैठक मांडली होती. यावेळी जिल्हाप्रमुख माऊली सांगळे, जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढुस जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब खर्जुले, जिल्हा संघटक जालिंदर आरगडे, यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
शेतकरी संघटनेचे प्रमुख रघुनाथ आरगडे, तालुका कार्याध्यक्ष अनिल विधाटे, धरणग्रस्त नागनाथ आगळे, उपाध्यक्ष पांडुरंग नवले, राजेंद्र कळसकर,आदिनाथ नवले,युवक जिल्हा उपाध्यक्ष संदीप पाखरे,अरविंद आरगडे,युवक प्रमुख विकास कोतकर,नेवासा शहराध्यक्ष विशाल शिरसाठ, सचिन साबळे, प्रताप उभेदळ, अमोल जोगदंड, सोमनाथ सांगळे, सुनील शेजुळ, सतीश विधाटे उपस्थित होते.
यावेळी शेतकरी संघटनेच्यावतीने हरिअप्पा तुवर, मेजर काळे, डॉ .कुलकर्णी, अॅड. शिरसाठ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे त्रिंबक भदगले, तालुकाध्यक्ष शरद जोशी, प्रणित शेतकरी संघटना गणपत मोरे, शेषराव गव्हाणे, तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड जीवन ज्योत फाउंडेशनचे कमलेश नवले, अॅड. जैत शेख, उद्योजक दत्तात्रय पाटील, खाटीक दिगंबार आवारे, चेअरमन राजेंद्र चामूटे, बाभूळवेढा सरपंच बाबासाहेब कोतकर, बंडू आरगडे, उपसरपंच रामकिसन चामूटे, शंकर टकले व परिसरातील शेतकऱ्यांनी बच्चुभाऊच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे.
यावेळी पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे, नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय जाधव यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला महसूल प्रशासनाच्यावतीने सौ.सरिता मुंडे यांनी यावेळी निवेदन स्वीकारले.





