मुंबई : मुंबईतील पवईतील एका स्टुडिओत घडलेले ओलीस नाट्य आणि त्यानंतर आरोपी रोहित आर्य याचा एन्काऊंटर या सगळ्या घडामोडींवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संदर्भात काहीही आरोपीच्या पायाला गोळी मारायला हवी होती असे म्हटले आहे. तर काहींनी या प्रकरणात कोर्टात जाण्याची तयारी केलेली आहे. या सगळ्या प्रकरणावर माजी पोलिस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले प्रदीप शर्मा? माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी त्यांच्या कारकीर्दीत अंडरवर्ल्डच्या अनेक गँगस्टरचे एन्काऊंटर केले आहे. त्यांनी पवईमध्ये घडलेल्या प्रकरणावर आपले मत मांडले आहे. ते म्हणाले माझ्या मते जे झाले ते योग्य आहे. पोलिसांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून १७ मुलांना वाचवलं. कारण आरोपीने सर्वत्र केमिकल्स फवारुन ठेवली होती. आग लागण्याचा धोका होता. प्रदीप शर्मा हे रोहित आर्यच्या एन्काऊंटरबद्दल म्हणाले एन्काऊंटर ठरवून केला जात नाही, अचानक होत असतो. एकतर गोळी खा नाही तर गोळी द्या, मग पोलिस तर गोळी देणारच. १०० आयपीसी प्रमाणे पोलिसांना पॉवर देण्यात आलेली आहे. बलात्कार होत असताना, बंदी बनवले असेल, जीवाला धोका असेल तर बळाचा वापर करण्याची पॉवर कायद्याने पोलिसांना दिली आहे. तंतोतंत कायद्याच्या पालन झाले आहे. जनता पोलिसांच्या सोबत हा फेक एन्काऊंटर नाही. स्वतःचे पैसे वसूल करायला आरोपीने अशा प्रकारे लहान मुलांचा वापर केला हे कितपत योग्य आहे. API अमोल वाघमारे याने सोसायटी, समाजासाठी हे केले आहे. १७ मुलांचा जीव वाचवला आहे. त्यांचं कौतुक करायला हवे. अशाप्रकारे कोर्टात जाणे चुकीचे आहे.आरोपीने सगळी कबुली दिलेली आहे. तसेच लहान मुलांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून केलेला हा एन्काऊंटर जस्टीफाईड आहे. पोलिसांनी काही घाबरायची गरज नाही. जनता पोलिसांच्याबरोबर आहे असे प्रदीप शर्मा म्हणाले आहेत.