Poona Club Premier League 2024 : कपिला परमार ऑल स्टार्स संघांचा सलग तिसरा विजय…

Sports In Pune : पुना क्लब लिमिटेडच्या वतीने आयोजित दहाव्या पुना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स, कपिला परमार ऑल स्टार्स संघांनी तिसरा विजय मिळवला. पुना क्लब क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत मल्लिक अर्जुन (१७ धावा व १-४) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर जेटस संघाने पृथ्वी लायन्स संघाचा २३ धावांनी पराभव केला.
अरुण खट्टर (१-७ व ३१ धावा) याने केलेल्या सुरेख खेळीच्या जोरावर तलब टायटन्स संघाने व्हीके टायगर्स संघाचा ७ गडी राखून पराभव केला. अन्य लढतीत प्रकाश कारिया (नाबाद ४२ धावा व १-५) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर कपिला परमार ऑल स्टार्स संघाने क्वालिटी वॉरियर्स संघावर ८ गडी राखून विजय मिळवला.
IND vs ENG 3rd Test : रोहित शर्मानं इंग्लंडविरुद्ध शतक झळकावून रचली विक्रमांची मालिका….
भार्गव पाठक (१-१ व ३३ धावा) याने केलेल्या सुरेख खेळीच्या जोरावर मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स संघाने व्हीएनएन वुल्व्हसचा ८ गडी राखून पराभव करत आपली विजयी मालिका कायम राखली. रौनक ढोले पाटील (नाबाद ५७ धावा व १-८) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर फोर ओक्स सेलर्स संघाने जीएम टायफून्स संघाचा १० धावांनी पराभव करून आगेकूच केली. आधिश शहाच्या नाबाद ५६ धावांच्या जोरावर ओबेरॉय आणि नील किंग्स ईगल्स संघाचा ४३ धावांनी पराभव केला.





