Sports In Pune : चॅम्प्स करंडक क्रिकेट स्पर्धेस गुरुवारपासून प्रारंभ…..

Sports In Pune – चॅम्प्स स्पोर्टस फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित चॅम्प्स करंडक १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत ५ संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा १२ वर्षांखालील गटात धायरी येथील सहारा क्रिकेट मैदानावर गुरुवारपासून रंगणार आहे. स्पर्धेत क्रिकेट स्ट्रायकर्स अ, क्रिकेट स्ट्रायकर्स ब, स्पेशल इलेव्हन, एके स्पोर्टस अकादमी, एजीएस क्रिकेट अकादमी या ५ संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/ipl-where-is-kamran-khan-the-2009-ipl-star-who-could-bowl-140-kmph-deliveries/
तसेच, ही स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेचे सामने २५ षटकांचे होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या संघाला करंडक, पदक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर, सामनावीर यांना आकर्षक अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याची माहिती स्पर्धा संचालक गोविंद पवार यांनी दिली.





