Sports In Pune : येत्या मंगळवारी ‘लोणावळा-पुणे’ सायकल स्पर्धेचे आयोजन…
Updated On:

Sports In Pune – वसंतदादा सेवा संस्था व कॉंग्रेस पक्षाच्या वतीने येत्या मंगळवारी लोणावळा ते पुणे सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्ताने होत असलेल्या या स्पर्धेचे यंदा ३५ वे वर्ष आहे. स्पर्धेची सुरुवात लाणावळा मुख्य चौकातून सकाळी ९ वाजता होणार असून जुन्या मुंबई-पुणे रस्तामार्गे बालेवाडी येथे संपेल.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/most-sixes-in-test-rohit-sharma-equals-viv-richards/
प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास ५००१ रुपये व करंडक, द्वितिय क्रमांकाच्या खेळाडूला ३५०१ रुपये व सन्मान चिन्ह तर तृतिय क्रमांकाच्या खेळाडूला १००१ रुपये व करंडक देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणिस संजय बालगुडे यांनी दिली आहे.





