पूजा सावंतने नवरात्रीनिमित्त शेअर केला खास व्हिडिओ; जुन्या आठवणींना दिला उजाळा

Pooja Sawant | मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री पूजा सावंतने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. अभिनयासह पूजा तिच्या नृत्य कौशल्यासाठी देखील ओळखली जाते. याशिवाय ती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या देखील संपर्कात असते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर नवरात्रीनिमित्त खास व्हिडीओ शेअर केला आहे.
पूजाने इन्स्टाग्रामवर १३ वर्ष जुना ‘आईचा जोगवा मागेन’ या गाण्यावरील सुंदर नृत्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या सादरीकरणामध्ये देवीच्या रुपातील पूजाचे भावपूर्ण हावभाव विशेष लक्ष वेधून घेत आहेत. या नृत्यासाठी पूजाने हिरवी साडी, हिरव्या बांगड्या, कपाळावर कुंकू आणि हळदीचा टिळा, नाकात नथ आणि मोकळे केस असा पारंपरिक लूक केला होता. हा व्हिडिओ शेअर करत तिने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. Pooja Sawant |
View this post on Instagram
हा व्हिडीओ शेअर पूजाने लिहिले, “१३ वर्षांपूर्वी महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात जोगवा करण्याची संधी मिळाली होती. त्यासाठी केदार सरांचे आभार मानावे तितके कमीच आहेत. अशी संधी भाग्यानेच मिळते. चारुशीला ताईने ह्याचं नृत्यदिग्दर्शन केलं होतं. ते जादूमय दिवस होते”, असं तिनं म्हटलं. पूजाने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांनी तिचे खूप कौतुक केले आहे. Pooja Sawant |
पूजाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर आतापर्यंत तिने अनेक सुरपहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून तिने मराठी मनोरंजन क्षेत्रात पदापर्ण केलं. ‘दगडी चाळ’ ‘नीलकंठ मास्तर’, ‘सतरंगी रे’, ‘आता गं बया’सारख्या चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे.
हेही वाचा:
बोगस लाडक्या बहिणींवर होणार कारवाई; 15 कोटींची रक्कम करणार वसूल





