Pooja Sawant : हिरवी साडी अन् नाकात नथ; पुजा सावंतचे साखरपुड्याचे फोटो समोर

Pooja Sawant : अभिनेत्री पुजा सावंत हिच्या लग्नाची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. यातच आता तिच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत. बॉयफ्रेंड सिद्धेश चव्हाणसोबत पुजाने गुपचूप साखरपुडा आटोपला आहे. काही दिवसांपूर्वीच तिने जोडीदारासोबतचा फोटो शेअर केले होते. त्यानंतर आता तिचा सारखपुडा संपन्न झाला असून या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे. सध्या साखरपुड्याचे फोटो तुफान व्हायरल होत आहे.
पुजा सावंतने मुंबईमध्ये १६ फेब्रुवारीला गुपचूप साखरपुडा आटोपला आहे. पूजा आणि सिद्धेश दोघांनीही खास साखरपुड्यासाठी खास मराठमोळा आऊटफिट केला होता. पूजाने साखरपुडा सोहळ्यासाठी हिरवी पैठणी साडी, नाकात नथ, हार असा मराठमोळा साज अभिनेत्रीने केला होता.
View this post on Instagram
पूजाच्या होणाऱ्या नवऱ्याने सिद्धेशने ऑफ व्हाईट रंगाचा सदरा परिधान केला होता. सध्या दोघांच्या लूकचे चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. पूजा आणि सिद्धेश दोघेही खास मराठमोळ्या अंदाजामध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. यावेळी साखरपुड्याला अनेक मराठी सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती.
View this post on Instagram
कोण आहे सिद्धेश चव्हाण?
पूजा आणि सिद्धेशच्या साखरपुड्यासाठी भूषण प्रधान, वैभव तत्ववादी, प्रार्थना बेहरे, फुलवा खामकर आणि गश्मीर महाजनी या सेलिब्रिटींनी तिच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती. २८ नोव्हेंबरला इन्स्टाग्रामवर बॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर करत पूजाने प्रेमाची कबुली दिली होती. तेव्हा पासून तिच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. सिद्धेश मुळचा मुंबईकर असून ऑस्ट्रेलियात फायनन्ससंबंधित काम करतो.
पूजा सावंतच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, क्षणभर विश्रांती, दगळी चाळ, दगळी चाळ २, पोस्टर बॉइज, नीळकंठ मास्तर, भेटली तू पुन्हा, बोनस या चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकतीच ती ‘मुसाफिरा’ या चित्रपटात झळकली होती.





