Vaidehi Parashurami – मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री वैदेही परशुरामी पुन्हा एकदा तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत आली आहे. अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणाऱ्या वैदेहीने आता मॉरिशसच्या नयनरम्य समुद्रकिनारी केलेल्या खास फोटोशूटमधून आपल्या सौंदर्याची अनोखी झलक दाखवली आहे.
निळाशार समुद्र, मनमोहक निसर्ग आणि त्यात सोनेरी रंगाचा आकर्षक डिझायनर गाऊन असा तिचा लूक सध्या सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.
वैदेही परशुरामी ही केवळ अभिनेत्रीच नाही, तर ती प्रशिक्षित कथ्थक नृत्यांगनादेखील आहे. मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्येही तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
तिच्या सहजसुंदर अभिनयासोबतच तिचा साधा-सोबर ते ग्लॅमरस असा फॅशन सेन्सही चाहत्यांना कायम आकर्षित करत असतो. यापूर्वी तिच्या पारंपरिक लूकमधील फोटोंचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली होती.
वैदेहीने हे खास फोटो शेअर करताना ‘Mauritius Waters…Day Light!’ असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाइक्सच्या माध्यमातून तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.
अभिनयासोबत फॅशनमध्येही वैदेहीची खास ओळख
वैदेही परशुरामी सोशल मीडियावरही सक्रिय असून वेळोवेळी वेगवेगळ्या लूकमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिचा हिरव्या साडीतील पारंपरिक अंदाज चर्चेत आला होता.
त्या लूकमध्ये नाजूक दागिने आणि साध्या मेकअपने तिचं सौंदर्य खुलून दिसत होतं. आता त्यानंतर मॉरिशसच्या समुद्रकिनारी केलेल्या या ग्लॅमरस फोटोशूटमुळे वैदेहीने पुन्हा एकदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.









