तीन तास पोलिसांची दमछाक: फिल्मी स्टाईल अटकेचा व्हिडिओ व्हायरल, अखेर शूटर ताब्यात, नेमकं काय घडलं?

Ahmedabad viral video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उड्डी मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तसेच काही लोकं त्या व्यक्तीला असे करू नको, असे आवाहान करताना दिसत आहे. तर हा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होणारा व्हिडिओ गुजरातमधील अहमदाबाद येथील असल्याचे सांगितले जात आहे.
एखाद्या चित्रपटातील थरारक दृश्याला लाजवेल असा हा प्रसंग अहमदाबाद शहरात घडला आहे. व्हिडिओत दिसणारी व्यक्ती इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली उडी मारण्याच्या प्रयत्नात आहे. त्या व्यक्तीचे नाव अभिषेक उर्फ संजयभाई सिंह तोमर असे आहे. त्याच्यावर अहमदाबादच्या पूर्व भागातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.
स्वयंपाक घरातील खिडीतून पळण्याचा प्रयत्न
अभिषेकला शूटर म्हणून ओळखले जाते. याच्या मागणावर पोलीस काही दिवसांपासून होते. त्याचा माग काढत ते त्याच्या अहमदाबादच्या शिवम आवास येथे आले होते. तो इथे असल्याची क्राइम ब्राँचला खात्रीलायक माहिती मिळाली होती. त्यानुसार ते त्याच्या दारावर पोहचले, तेव्हा त्याने दार उघडण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिस दार तोडून घरात आले. त्यावेळी अभिषेक स्वयंपाक घरातील खिडीतून पळण्याचा प्रयत्न करत थेट पाचव्या मजल्यावरील कठड्यावर चढला.
येथे पोहचल्यानंतर अभिषेकने मोबाईलचे व्हिडिओ रिकॅार्डिंग चालू केले. या रेकॅार्ड केलेल्या व्हिडिओत अभिषेक “मला माहिती आहे, तुम्ही माझ्याशी कसे वागाल. खूप वाईट होईल. तुम्हाला शरण जाण्यापेक्षा मी मरण पसंत करेन.” असे तो पोलिसांना म्हणत होता. यामुळे परिस्थिती तणावपूर्वक बनली होती. यामुळे पोलिसांनी त्याला सन्मानाने वागणूक देण्याचे आणि कायदेशीर प्रक्रिया पाळण्याचे आश्वसन दिले. पण तो काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता.
When the team of City Crime Branch in Ahmedabad, Gujarat reached to arrest a criminal, he started threatening to jump in the style of the movie Sholay. The Crime Branch had to work hard to arrest Abhishek alias Shooter AK 47. pic.twitter.com/NV4wsH61tM
— Mohd Nadeem Siddiqui🇮🇳 (@nadeemwrites) June 7, 2025
अखेर सुमारे तीन तासांच्या नाट्यमय प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने अभिषेकला कठड्यावरून सुरक्षितपणे खाली उतरवले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. या नाट्यमय अटकेने अहमदाबादमधील नागरिकांमध्ये खळबळ माजवली आहे.
अभिषेक उर्फ शूटर संजयभाई सिंह तोमर हा अहमदाबादच्या पूर्व भागातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये नोंद असलेला गुन्हेगार आहे. तो बराच काळ पोलिसांना गुंगारा देत होता. आमच्या अनेक पथकांनी त्याचा माग काढला आणि त्याला ताब्यात घेतले असल्याचे अहमदाबाद क्राइम ब्रँचचे उपायुक्त अजित रजियान यांनी सांगितले.





