sonam bajwa: मुंबई विमानतळावर दिसली ‘एक दीवाने की दीवानियत’ चित्रपटाची अभिनेत्री सोनम बाजवा, पॅपराझींना म्हणाली… “सकाळी सात वाजता कोण फोटो काढतं?”

Sonam Bajwa : आज सकाळी मुंबई विमानतळावर अभिनेत्री सोनम बाजवा अतिशय साध्या लुकमध्ये दिसली. पॅपराझींनी फोटो काढण्याची विनंती केली तेव्हा सोनमने दिलेलं उत्तर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
सध्या सोनम बाजवा तिच्या ‘एक दीवाने की दीवानियत’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रेक्षकांना या चित्रपटात सोनमचं अभिनयाचं कौशल्य खूप आवडत आहे. आज सकाळी सोनम मुंबई विमानतळावर दिसली. पॅपराझींनी तिच्याकडे फोटो काढण्याची विनंती केली, त्यावर सोनम हसत म्हणाली, “अहो, सकाळी सात वाजता कोणता फोटो देते ?” तिच्या या विनोदी उत्तरावर सगळे हसले.
त्या वेळी सोनमने साधा आणि आरामदायी पेहराव केला होता. तिचा हा कॅज्युअल पण सुंदर अंदाज चाहत्यांच्या मनात घर करत आहे.
View this post on Instagram
‘एक दीवाने की दीवानियत’ बद्दल:
हा चित्रपट एका प्रेमकथेवर आधारित आहे. हर्षवर्धन राणे यात विक्रमादित्य नावाच्या कलाकाराची भूमिका साकारतो, जो अदा (सोनम बाजवा) नावाच्या मुलीच्या प्रेमात वेडापिसा होतो. मात्र ही प्रेमकथा नंतर एका धोकादायक आणि वेडसर रूपात बदलते.
सध्या ‘एक दीवाने की दीवानियत’, आयुष्मान खुरानाच्या ‘थामा’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जोरदार टक्कर देत आहे.
बॉक्स ऑफिस कलेक्शन:
‘एक दीवाने की दीवानियत’ने पहिल्या दिवशी ९ कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी ७.७५ कोटी आणि तिसऱ्या दिवशी ६ कोटी रुपयांचं कलेक्शन झालं. चौथ्या दिवशी दुपारपर्यंत या चित्रपटाने ३६ लाख रुपये कमावले असून, एकूण कमाई २३.११ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
सोनमचा हा साधा अंदाज आणि तिचं हसतं उत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं आहे.





