अपघाताची घटना गौतमी पाटीलची अडचण वाढवणार? थेट चंद्रकांत पाटलांचा डीसीपींना फोन; व्हिडीओ व्हायरल, नेमकं प्रकरण काय?

Gautami Patil : गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे सतत चर्चेत असते. मात्र, ती यावेळी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. ३० सप्टेंबरच्या दिवशी पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात एका रिक्षाला पाठीमागून आलेल्या एका चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली होती.
या अपघातात रिक्षातील चालक आणि इतर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू असून रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर आहे. सामाजी मरगळे असं या अपघातात जखमी झालेल्या रिक्षाचालकाचं नाव आहे. या अपघाताच्या घटनेत चारचाकी वाहनातील चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आता पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान गतीने फिरवली आहेत.
मंत्री चंदक्रांत पाटील यांचा डीसीपींना फोन
पोलिसांनी गौतमी पाटील हिला नोटीस पाठवली असून तिला हजर राहण्यास सांगितलं आहे. तिला पाठवण्यात आलेल्या नोटीसमुळे गौतमीला अटक होणार? अशा बातम्या समोर येत आहेत. पण तिला पोलिसांनी नोटीस का पाठवली आणि या सगळ्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपींना फोन लावून गाैतमी पाटीलला उचलायचे की नाही? असं व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दिसत आहे.
नातेवाईकांचे गंभीर आरोप
सगळ्यात महत्वाच म्हणजे गौतमीला पोलिसांनी नोटीस पाठवली याचं कारण ज्या वाहनाने रिक्षाला धडक दिली. ते वाहन गौतमी पाटील हिच्या नावावर रजिस्टर असल्याची माहिती समोर आली आहे. या सगळ्या प्रकरणात रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी गौतमी पाटीलवर गंभीर आरोप केले आहेत. अपघाताच्या वेळी गौतमी कारमध्ये उपस्थित होती, असा गंभीर आरोप रिक्षालाचकांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांनी या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट डीपीसींना फोन लावला. या संभाषनात गाैतमी पाटीलला उचलायचे की नाही? ती गाडी कुणाची तरी आहे ना..रिक्षावाला गंभीर आहे. तिला म्हणाव तू असशील गाैतमी पाटील वगैरे पण त्यांचा खर्च तरी कर म्हणाव, असं चंद्रकात पाटील म्हणत आहेत. या संभाषनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हेही वाचा :“भुंकल्याशिवाय रामदास कदमांसारख्या श्वानांना कोणीही किंमत देत नाही”, भास्कर जाधवांची जहरी टीका




