‘द फॅमिली मॅन सीझन ३’ चा मजेशीर व्हिडीओ व्हायरल; श्रीकांत तिवारीच्या अनोख्या अंदाजाने वेधले लक्ष

The Family Man 3 : अॅमेझॅान या ओटीटी माध्यमावरील सर्वात लोकप्रिय वेबसिरीज पैकी ‘द फॅमिली मॅन’ ही देखील एक वेबसिरीज आहे. या वेबसिरीजने मोठा इतिहास रचला असून, सर्व वयोगटातील प्रेक्षकांनी सिरीजवर भरभरून प्रेम केले. या सिरीजचे आतापर्यंत दोन सीझन रिलीज झाले असून, दोन्ही सिझनला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता तिसराही सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या सिरीजच्या अपडेटबाबत एक मजेशीर व्हिडीओ प्राइम व्हिडीओवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओतून सिरीजची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. २१ नोव्हेंबरला द फॅमिली मॅन ३ रिलीज होणार आहे. मनोज बाजपेयीचा मजेशीर व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या व्हिडीओत सिरीजमधील मुख्य अभिनेत्री प्रिया मणी काळानुसार होणाऱ्या बदलांबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसत आहे. शिवाय श्रीकांत तिवारी (मनोज बाजपेयी) गेल्या चार वर्षांपासून एका अनोख्या पद्धतीने सराव करताना दिसतो. तो असे का करत आहे हे तुम्हाला संपूर्ण टीझर पाहिल्यानंतर कळेल.
‘द फॅमिली मॅन’चा पहिला सीझन २० सप्टेंबर २०१९ रोजी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर दुसरा सीझन ४ जून २०२१ रोजी प्रदर्शित झाला होता. आता चार वर्षांनंतर २१ नोव्हेंबर २०२५ रोजी पुन्हा एकदा या वेबसिरीजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram
द फॅमिली मॅन सीझन ३ मध्ये काही नवीन चेहरे देखील दिसणार आहे. मनोज बाजपेयी, प्रिया मणी आणि शारिब हाश्मी यांच्या व्यतिरिक्त अभिनेता जयदीप अहलावत आणि अभिनेत्री निमरत कौर या नव्या कलाकारांची एन्ट्री सिरीजमध्ये झाली आहे. आता सिरीजच्या कथेत कोणत्या नवीन गोष्टी पाहायला मिळतील यासाठी काही वेळ वाट पाहावी लागणार आहे.
हेही वाचा : WhatsApp: व्हॉट्सअॅपवर येतोय नवा फीचर! आता स्टेटसला देता येणार इमोजी रिअॅक्शन





