नोरा अन् आयुष्यमानचा भन्नाट डान्स; चाहत्यांच्या भरभरून कमेंट्स, व्हिडीओ व्हायरल

Nora Fateh : अभिनेत्री नोरा फतेह तिच्या अभिनयाबरोबरच आयटम साँगसाठी लोकप्रिय आहे. नोराचे दिलबर गाण्यावरील आयटम साँग खूप प्रसिद्ध झाले होते. या दिवाळीत थामा नावाचा सिनेमा प्रदर्शित होत आहे. या सिनेमात नोराचे एक आयटम साँग असून, या गाण्याचे ‘दिलबर की आंखों’ असे बोल आहेत. सध्या हे गाणं यूट्यूबवर ट्रेंन्डिंगमध्ये आहे. अशातच सोशल मीडियीवर नोरा फतेह आणि अभिनेता आयुष्यमान खुराना यांचा याच गाण्यावर डान्स करतानाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये दोन्ही स्टार्स ‘दिलबर की आँखों का’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. या व्हिडीओत दोघांचीही सिझलिंग केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे. व्हिडिओमध्ये नोरा टू-पीस ब्राऊन ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे, तर आयुष्मान खुराना गुलाबी शर्ट, ब्लॅक जॅकेट आणि पॅन्टमध्ये हॅन्डसम लूकमध्ये दिसत आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले, “ट्रेडिंग ऑन स्क्रीन गाण्याचे स्वर अप्रतिम आहेत,” दुसऱ्या चाहत्याने लिहिले, “नोरा, नेहमीप्रमाणे तू जोरदार पुनरागमन करत आहेस.” दुसऱ्या चाहत्याने लिहिले, ‘थमाच्या रिलीजची वाट पाहत आहे.’
थामा हा सिनेमा एक रोमँटिक कॅामेडी हॅारर लव्हस्टोरी सिनेमा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे. तर नीरेन भट, सुरेश मॅथ्यू आणि अरुण फलारा यांनी सिनेमाची कथा लिहिली आहे. या सिनेमाची निर्मिती दिनेश विजन आणि अमर कौशिक यांनी केली आहे. मॅडॉक हॉरर कॉमेडी युनिव्हर्समधील हा पाचवा भाग आहे.
या सिनेमात आयुष्मान खुराना, रश्मिका मंदाना, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि परेश रावल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा 21 ऑक्टोबर 2025 रोजी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा : भारतासाठी नवीन चिंता ; ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाडलेले चिनी लढाऊ विमान बांगलादेश खरेदी करणार





