पुणे – पिंपरी-चिंचवडमध्ये गणेशोत्सव बंदोबस्तासाठी पोलीस मित्र सज्ज; २०० सभासद मैदानात
Updated On:

पुणे : गणेशोत्सव काळात पोलीस बंदोबस्ताला सहकार्य करण्यासाठी पोलीस मित्र संघटनेचे २०० सदस्य पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कार्यरत झाले असल्याची माहिती संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी दिली आहे.
गेल्या १२ वर्षांपासून संघटनेचे कार्य सुरू असून गर्दी नियंत्रण, हरवलेल्यांना मदत केंद्रापर्यंत पोहोचवणे, वयस्करांना मदत करणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत पोलीसांना सहकार्य करणे अशी कामे सभासद कोणत्याही मोबदल्याविना करतात.
यंदा १०० सभासद पुण्यासाठी तर १०० पिंपरी-चिंचवडसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. पुण्यात बेलबाग चौक ते मंडई परिसरात हे सभासद पोलीसांसोबत बंदोबस्तासाठी काम करीत आहेत. सभासदांनी बॅच लावणे बंधनकारक असून विसर्जन मिरवणुकीसाठी आणखी सभासद सहभागी होणार असल्याचे कपोते यांनी सांगितले.




