PM Narendra Modi: मोठी बातमी! देशभरातील मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींचे जनतेला मोठा आवाहन
PM Narendra Modi: पंतप्रधानांनी स्पष्ट केले की कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात कोणतीही कमतरता नाही आणि नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. कोविड-१९ काळातील ‘टीम इंडिया’च्या धर्तीवर केंद्र आणि राज्ये मिळून या परिस्थितीचा सामना करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर देशात लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले. पश्चिम आशियातील (मध्य पूर्व) तणावाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुमारे दोन तास चालली.
पंतप्रधानांनी ‘टीम इंडिया’च्या भावनेतून केंद्र आणि राज्यांनी समन्वयाने काम केल्यास देश या परिस्थितीला यशस्वीपणे सामोरे जाईल, असा विश्वास व्यक्त केला. आर्थिक व व्यापारी स्थिरता राखणे, ऊर्जा सुरक्षेची हमी देणे, नागरिकांचे हित जपणे तसेच उद्योग आणि पुरवठा साखळी मजबूत ठेवणे, ही सरकारची प्रमुख प्राधान्ये असल्याचे त्यांनी नमूद केले.
लॉकडाऊनबाबत स्पष्ट भूमिका –
बैठकीत पंतप्रधानांनी देशात कोणताही लॉकडाऊन लागू केला जाणार नसल्याचे ठामपणे सांगितले. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत त्यांनी जबाबदार माहिती प्रसारित करण्यावर भर दिला. केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी (Hardeep Singh Puri) आणि निर्मला सितारामन (Nirmala Sitharaman) यांनीही लॉकडाऊनच्या चर्चांना निराधार व हानिकारक ठरवत फेटाळले.
PM Modi chaired meeting with CMs to review preparedness in light of the emerging situation in West Asia crisis
PM expressed confidence that working together as “Team India,” the nation will successfully overcome the situation
PM stressed that Government’s priorities are to… pic.twitter.com/X3djnwJBAg
— ANI (@ANI) March 27, 2026
पुरवठा साखळी आणि साठेबाजीवर नियंत्रण –
राज्यांनी पुरवठा साखळी सुरळीत ठेवावी, तसेच साठेबाजी आणि नफेखोरीविरोधात कठोर कारवाई करावी, असे निर्देश पंतप्रधानांनी दिले. बदलत्या परिस्थितीला तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी सक्षम समन्वय यंत्रणा उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
हेही वाचा – चीनला 440 व्होल्टचा मोठा झटका; इराणे 2 जहाजांना हुसकावून लावले
कृषी आणि खत वितरणावर भर –
कृषी क्षेत्रात विशेषतः खतांचा साठा व वितरण यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. संभाव्य अडचणी टाळण्यासाठी पूर्वनियोजन करण्याचे आवाहनही करण्यात आले. सीमावर्ती आणि किनारी राज्यांनी शिपिंग, आवश्यक वस्तूंचा पुरवठा आणि सागरी वाहतूक याबाबत उद्भवणाऱ्या आव्हानांवर विशेष लक्ष द्यावे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन –
चुकीची माहिती आणि अफवा पसरू नयेत, यासाठी अचूक व विश्वासार्ह माहितीचा प्रसार करण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या उपाययोजनांचे स्वागत करत पूर्ण सहकार्याची ग्वाही दिली. बैठकीत राज्यांनी पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा असल्याची माहिती दिली. केंद्र सरकारने कमर्शियल एलपीजीचे वाटप २० टक्क्यांनी वाढवून ते पूर्वीच्या मागणीच्या ७० टक्क्यांपर्यंत नेले आहे.
जागतिक तणावाची पार्श्वभूमी –
पश्चिम आशियात इराण (Iran), इस्त्राईल (Israel) आणि अमेरिका (United States) यांच्यातील संघर्षामुळे होर्मूझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) परिसरात तणाव वाढला आहे. याचा जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होत असून, भारताने आवश्यक तयारी सुरू ठेवली आहे. पंतप्रधानांनी स्पष्ट केले की कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात कोणतीही कमतरता नाही आणि नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. कोविड-१९ काळातील ‘टीम इंडिया’च्या धर्तीवर केंद्र आणि राज्ये मिळून या परिस्थितीचा सामना करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.





