Narendra Modi : महिला आरक्षण अंमलबजावणीसाठीचे घटनादुरूस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी आणि विशेषत: भाजपने आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. त्या घडामोडीवरून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी विरोधकांवर घणाघाती टीका केली. (Narendra Modi) देशाला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी देशातील सर्व महिलांची माफी मागितली. महिला आरक्षणाला विरोध करून विरोधकांनी पाप केले. त्याची शिक्षा त्यांना नक्कीच होईल, असा इशारा त्यांनी दिला. (Narendra Modi) विरोधक एकवटल्याने शुक्रवारी लोकसभेत १३१ व्या घटनादुरूस्तीशी संबंधित विधेयक फेटाळले गेले. त्या घडामोडीकडे मोदी सरकारचे महापरीक्षेतील अपयश म्हणून पाहिले जात आहे. अर्थात, विधेयक नामंजूर झाले तरी महिला आरक्षणाच्या निश्चितीसाठीचा लढा चालूच ठेवण्याचा निर्धार सरकारकडून बोलून दाखवण्यात आला. त्याशिवाय, सत्ताधाऱ्यांनी संसदेबाहेर आक्रमक होत विरोधकांना घेरण्याची रणनीती अवलंबली. त्यासाठी स्वत: मोदीही पुढे सरसावले. (Narendra Modi)