Pro Kabaddi League 2024 : आजपासून पीकेएल 11 च्या प्लेऑफचा थरार…! जाणून घ्या, सामन्यांची Timings-Dates अन् live streaming सह सर्व डिटेल्स….

Pro Kabaddi League Playoffs 2024 Schedule : प्रो कबड्डी लीग (PKL) 2024 ने मंगळवारी लीग टप्पा पूर्ण केला असून 68 दिवसांच्या कालावधीत 12 संघांमध्ये एकूण 132 सामने खेळले गेले आहेत. अंतिम स्थितीतील सर्वाधिक गुणांच्या आधारे PKL सीझन 11 साठी टाॅप सहा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत.
प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामाची सुरुवात अतिशय शानदार पद्धतीने झाली. त्याचा अंतिम सामना 29 डिसेंबरला होणार आहे. सध्या लीग टप्प्यातील सामने संपले आहेत. यासह प्लेऑफमधील सर्व 6 संघही निश्चित झाले असून आता बाद फेरीच्या (knockout matches) सामन्यांची वेळ आहे. या मोसमात अनेक संघ चांगले खेळले आणि प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के केले. काही संघ असे होते जे थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
यामध्ये प्लेऑफमधील सहा संघामध्ये हरियाणा स्टीलर्स आणि दबंग दिल्ली संघानं सर्वाधिक गुणांच्या आधारे थेट उपांत्य फेरी गाठली आहे तर उर्वरित चार संघ म्हणजे यूपी योद्धाज, पटना पायरेट्स, यू मुंबा, जयपूर पिंक पँथर्स हे एलिमिनेटर सामन्याव्दारे उपांत्य फेरी गाठतील. त्यानंतर दोन उपांत्यफेरीच्या लढती होतील. त्यातील विजेते 29 डिसेंबरला विजेतेपदासाठी आमने-सामने येतील.
प्लेऑफमधील सहा संघ….
1- हरियाणा स्टीलर्स (Q) : (सामने 22: गुण – 84) : विजय – 16, पराभव – 6
2- दबंग दिल्ली केसी (Q): (सामने 22 : गुण – 81) : विजय – 13, पराभव – 5, बरोबरी – 4
3- यूपी योद्धाज (Q): (सामने 22 : गुण – 79) : विजय – 13, पराभव – 6, बरोबरी – 3
4- पटना पाइरेट्स (Q): (सामने 22 : गुण – 77) : विजय – 13, पराभव – 7, बरोबरी – 2
5- यू मुम्बा (Q): (सामने 22 : गुण – 71) : विजय – 12, पराभव – 8, बरोबरी – 2
6- जयपुर पिंक पैंथर्स (Q): (सामने : 22 गुण – 70) : विजय – 12, पराभव – 8, बरोबरी – 2
The 6️⃣ teams who will fight for the ultimate prize 🤩💪
Who will lift the 🏆 on 29th December? #ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #PKLPlayoffs pic.twitter.com/54AKw0YoYW
— ProKabaddi (@ProKabaddi) December 25, 2024
पीकेएल 2024 प्लेऑफचे वेळापत्रक….
(1) एलिमिनेटर सामने : 26 डिसेंबर 2024
एलिमिनेटर 1 : यूपी योद्धा विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स – रात्री 8:00 (IST) – बालेवाडी क्रीडा संकुल, पुणे
एलिमिनेटर 2 : पाटणा पायरेट्स विरुद्ध यू मुंबा – रात्री 9:00 (IST) – बालेवाडी क्रीडा संकुल, पुणे
(2) सेमीफायनल सामने : 27 डिसेंबर 2024
उपांत्य फेरी 1 : हरियाणा स्टीलर्स विरुद्ध निश्चित होणं बाकी (To Be Confirmed) – रात्री 8:00 (IST) – बालेवाडी क्रीडा संकुल, पुणे
उपांत्य फेरी 2 : दबंग दिल्ली केसी विरुद्ध निश्चित होणं बाकी (To Be Confirmed) – रात्री निश्चित होणं बाकी (IST) – बालेवाडी क्रीडा संकुल, पुणे
(3) फायनल सामना : 29 डिसेंबर 2024
अंतिम सामना : उपांत्य फेरी 1 विजेता वि उपांत्य फेरी 2 विजेता – रात्री 8: 00 (IST) – बालेवाडी क्रीडा संकुल, पुणे
प्लेऑफचे सामने कुठे पाहायचे?
प्रो कबड्डी लीग 2024 च्या प्लेऑफचे सामने स्टार स्पोर्ट्स 2 HD आणि स्टार स्पोर्ट्स 2 वर थेट प्रक्षेपण केले जातील. सर्व पाच नॉकआउट सामने Hotstar मोबाईल ऍप्लिकेशन आणि त्याच्या अधिकृत वेबसाइटवर देखील लाइव्ह स्ट्रीम केले जातील.





