Pro Kabaddi League 2024 : पीकेएल 11 च्या प्लेऑफमध्ये ‘या’ 6 संघांनी केला प्रवेश, दोघांना प्रथमच विजेतेपद पटकावण्याची संधी…

Pro Kabaddi League Playoffs All Teams Decided : प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामाची सुरुवात अतिशय शानदार पद्धतीने झाली. त्याचा अंतिम सामना 29 डिसेंबरला होणार आहे. सध्या लीग टप्प्यातील सामने संपले आहेत. यासह प्लेऑफमधील सर्व 6 संघही निश्चित झाले असून आता बाद फेरीच्या (knockout matches) सामन्यांची वेळ आहे. या मोसमात अनेक संघ चांगले खेळले आणि प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के केले. काही संघ असे होते जे थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
प्लेऑफसाठी पात्र ठरलेले संघ…
1. हरियाणा स्टीलर्स (थेट उपांत्य फेरी) : हरियाणा स्टीलर्स संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी राहिला आणि थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला. या संघाने 22 पैकी 16 सामने जिंकले आणि 6 सामने गमावले.
2. दबंग दिल्ली (थेट उपांत्य फेरी) :आशु मलिकच्या नेतृत्वाखाली दबंग दिल्ली संघाने थेट उपांत्य फेरीत मजल मारली आहे. या संघाने साखळी टप्प्यात एकूण 22 सामने खेळले आणि यादरम्यान त्यांनी 13 सामने जिंकले आणि केवळ 5 सामने गमावले. संघाने 4 सामने बरोबरीत सोडवले. विशेष म्हणजे या हंगामात दबंग दिल्लीने सलग 15 सामने न हारण्याचा विक्रम केला आहे.
3. यूपी योद्धा : पीकेएलमध्ये सर्वाधिक सातत्यपूर्ण कामगिरी करणारा यूपी योद्धाही प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. या संघाने 22 पैकी 13 सामने जिंकले आणि 6 सामने गमावले. संघाचे तीन सामने बरोबरीत राहिले. यूपीचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर राहून प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे.
4. पाटणा पायरेट्स : पीकेएल PKL इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या पटना पायरेट्सने गुणतालिकेत चौथे स्थान मिळवून प्लेऑफमध्ये प्रवेश केला. पटनाने 22 पैकी 13 सामने जिंकले आणि 7 सामने हरले आणि 2 सामने बरोबरीत सोडविले. यासह संघाने 77 गुणांसह प्लेऑफमधील स्थान निश्चित केले.
5. यू मुंबा : दुसऱ्या सत्रातील चॅम्पियन यू मुंबा हा प्लेऑफमध्ये जाणारा शेवटचा संघ होता. मात्र, त्यांचा दावेदारी मजबूत होती आणि केवळ औपचारिक घोषणा व्हायची बाकी होती. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात बंगाल वॉरियर्सविरुद्ध विजयाची नोंद करून त्यांनी प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित केले.
6. जयपूर पिंक पँथर्स : जयपूर पिंक पँथर्स पुन्हा एकदा प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. संघाने साखळी टप्प्यातील 22 पैकी 12 सामने जिंकले आणि सहाव्या स्थानावर राहून प्लेऑफमध्ये प्रवेश केला.
Here’s your final standings for Pro Kabaddi League Season 11 📊
Who will emerge as CHAMPIONS? 🏆#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar pic.twitter.com/4Po9zCDV9v
— ProKabaddi (@ProKabaddi) December 24, 2024
आव्हान संपुष्टात आलेले संघ….
दरम्यान, उर्वरित सहा संघ म्हणजे तेलुगू टायटन्स (66 गुण),पुणेरी पलटण (60 गुण), तमिळ थैलावाज (50 गुण), बंगाल वॉरियर्स (41 गुण), गुजरात जायंट्स (38 गुण) आणि बेंगळुरू बुल्स (19 गुण) यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
Pro Kabaddi 2024 (Match 132) | प्लेऑफचा सहावा संघ ठरला, यू मुम्बाची Playoffs मध्ये दणदणीत एन्ट्री…
‘या’ दोन संघांना प्रथमच चॅम्पियन होण्याची संधी….
हरियाणा स्टीलर्स आणि यूपी योध्दा या संघांना पहिल्यांदा चॅम्पियन होण्याची संधी आहे. उर्वरित संघामध्ये पाटणा पायरेट्सने सीझन 3,4,5 मध्ये तर जयपूर पिंक पॅथर्सने सीझन 1 आणि 9 मध्ये विजेतेपद पटकावले आहे. तसेच यू मुब्मा (सीझन 2) आणि दबंग दिल्ली(सीझन 8) संघाने प्रत्येकी एकदा विजेतेपदावर कब्जा केला आहे.





