Pimpri News : कचऱ्याच्या डोंगराखाली इमारत दबली; 15 कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात
अतिवृष्टीमुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri News) मोशी कचरा डेपो यैथील कचरा डोंगराचे भूसखलन झाले. यात वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची प्रशासकीय इमारत दबली असून दोन कर्मचारी दगावले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Updated On:

Pimpri News : अतिवृष्टीमुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri News) मोशी कचरा डेपो यैथील कचरा डोंगराचे भूसखलन झाले. यात वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची प्रशासकीय इमारत दबली असून दोन कर्मचारी दगावले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुमारे १५ कर्मचारी ढिगाऱ्याखाली दबले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मोशी कचरा डेपो येथे महापालिकेने (Pimpri News) वेस्ट टू एनर्जी प्रकल्प सुरू केला असून येथे प्रशासकीय इमारत देखील आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथे कचऱ्याचे भले मोठे डोंगर तयार झाले आहेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनात कचऱ्या डोंगर कोसळला आणि इमारतही धसली.
चार कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी (Pimpri News) मदतकार्य सुरू केले असून, अग्निशामक दल व एनडीआरएफ व आपत्ती व्यवस्थापनाचे जवान पोहोचले आहे. महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.




