Pimpri Crime | ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावाखाली ३४ लाखांची फसवणूक

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – एका नागरिकाला ऑनलाइन शेअर ट्रेडिंग गुंतवणुकीच्या नावाखाली ३३ लाख ७३ हजार २८० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हि घटना हिंजवडी येथे २५ जून ते २९ जुलै या कालावधीत घडली.दर्पण राजेश्वर राव (वय ३५, रा. पार्क एस्टोरा, मारुंजी लिंक रोड, हिंजवडी) यांनी शनिवारी (दि. २५) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी विविध मोबाइल धारक तसेच बँक खातेधारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून रोजी फेसबुकवर “222 FYERS VIP Trading Strategy” नावाच्या गुंतवणूक ग्रुपची जाहिरात पाहून हा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन केला. आरोपींनी फिर्यादीला FYERS HNI App डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून विविध बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.
फिर्यादीकडून तब्बल ३३ लाख ७३ हजार २८० रुपयांची गुंतवणूक करून घेतल्यानंतर आरोपींनी आणखी पैशांची मागणी सुरू केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. आरोपींचे मोबाइल क्रमांक 9791941724, 9601304868, 9163832991, 9932502061 आणि विविध बँक खाती तपासात समोर आली आहेत. हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.




