Cyber Fraud : आर्किटेक्टला ‘मोठा परतावा’ पडला महागात; ५७ लाखांचा गंडा घालून तिघेजण पसार
Cyber Fraud : साताऱ्यातील सायबर गुन्हेगारीचा ग्राफ वाढला; सुशिक्षित नागरिकही बनतायत सॉफ्ट टार्गेट.
Updated On:

Cyber Fraud – विलासपूर येथील आर्किटेक्चर विनायक एकनाथ धनावडे (वय ४६) यांना ग्लोबिक्सवाल्ट या वॉलेटमध्ये शेअर ट्रेडिंग करुन जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांची सुमारे ५७ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तीनजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विनायक धनावडे यांनी सोशल मीडियावर ग्लोबिक्सवाल्ट शेअर ट्रेडिंग ची जहिरात पहिली.
यावर दिलेल्या नंबरवर संपर्क करताच त्यांना प्रियांका शर्मा व संदिप भंडारी, मेनटॉरअंकल यांनी अधिक माहिती देण्याच्या नावाखाली व्हॉट्सअॅप ग्रुपला जोडून घेतले. त्यावर माहिती देत जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यामुळे धनावडे यांनी प्रियांका, संदिप व मेनटॉरअंकल यांच्या सांगण्यावरुन वेगवेगळ्या बॅक अंकाउंटवरुन ५६ लाख ९९ हजार ५५० रुपये पाठविले.
काही दिवस गेले तरी कोणताच परतावा मिळत नसल्याने धनावडे यांनी तिघांशी संपर्क केला. परंतू कोणताही संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार संबंधित तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास निरीक्षक शेवाळे करत आहेत.





