Pimpri Crime News : पिंपरी-चिंचवड हादरलं…! जिम ट्रेनर तरुणीने मित्राच्या मदतीने तरुणाला संपवलं, नेमकं कारण काय?

Pimpri Crime News : दिवसेंदिवस पुणे शहरातील गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहे. गेल्या काही काळापासून पैसा, ड्रग्स, अनैतिक संबंध यातून भयावह अशा गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच आता पुण्याला लागून असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये जिम ट्रेनर तरुणीने मित्राच्या मदतीने एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर पिंपरी चिंचवडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आरोपी स्वतः पोलिसांना समोर हजर झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत तरुण वारंवार तरुणीला त्रास देत होता, त्यातून ही हत्येचा घटना घडल्याचं पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे. गोपीनाथ उर्फ लल्ला वर्पे असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. यश पाटोळे आणि प्रांजल तावरे अशी आरोपी जिम ट्रेनरची नावं आहेत. या दोघांची मयत तरुणाची जिममध्येच ओळख झाली होती.
पुन्हा तोच प्रकार घडल्याने….
१३ अॅागस्टच्या दिवशी दोन्ही आरोपींच्या पार्टनरशिपमध्ये असलेल्या प्रोटीन पझल शॅापमध्ये दुपारच्या सुमारास गोपीनाथ उर्फ लल्ला वर्पे हा आला होता. त्यावेळी त्याने प्रांजलला शिवीगाळ केली. वारंवार होणाऱ्या शिवीगाळ आणि पैशांची मागणी या त्रासाला प्राजंल कंटाळली होती. लल्ला वर्पे याच्याकडून पुन्हा त्रास देण्याचा तोच प्रकार पुन्हा घडला.
स्वतः पोलिसांसमोर झाले हजर
त्यावेळी प्रांजलने त्याच्या कानशिलात लगावली. त्यानंतर तिने आणि यशने मिळून लोखंडी रॉड आणि पहारने वर्पे याला मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला होता. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॅाक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर प्रांजल आणि यश हे दोघेही दिघी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन हजर झाले आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून प्राजंलने केलेले आरोपांची पोलिस चौकशी करत आहेत.
हेही वाचा : Voter List : नालासोपारा मतदार यादीत घोळ; एकाच महिलेचे नाव सहा वेळा, जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश





