Political News : मोठी घडामोड..! माजी मुख्यमंत्र्यांच्या विश्वासू नेत्यानं साथ सोडली; राजकीय वर्तुळात खळबळ
Political News : लालूप्रसाद यादव यांचे विश्वासू सहकारी मानले जाणारे मृत्यूंजय तिवारी यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे.

Political News : बिहारच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ झाली असून राष्ट्रीय जनता दल (आरजेडी)चे माजी प्रवक्ते आणि लालूप्रसाद यादव यांचे विश्वासू सहकारी मानले जाणारे मृत्यूंजय तिवारी यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षांतरामुळे आरजेडीला मोठा धक्का मानला जात आहे. (Political News)
भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मृत्यूंजय तिवारी यांनी पाटणा येथील हनुमान मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करून आपल्या नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली. (Political News)
पक्षप्रवेशानंतर बोलताना तिवारी यांनी आरजेडी नेतृत्वावर गंभीर आरोप केले. त्यांनी तेजस्वी यादव यांच्यावर पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा तसेच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप केला. याच कारणांमुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. (Political News)

मृत्यूंजय तिवारी यांनी २०१४ मधील पक्षाच्या कठीण काळाची आठवण करून दिली. त्यावेळी लालूप्रसाद यादव यांनी त्यांच्यावर राष्ट्रीय प्रवक्ते आणि मीडिया प्रभारी म्हणून महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रामाणिकपणे काम केल्याचेही त्यांनी नमूद केले. (Political News)
Political News : राजकीय भूकंप..! राष्ट्रपतींचा तडका फडकी राजीनामा, देशात खळबळ
Political News : ‘या’ राज्यातील सरकार कोसळणार? भाजप नेत्याचा खळबळजनक दावा



