Accident News : ब्रेक फेल अन् काही क्षणांत होत्याचं नव्हतं! दोन ट्रकांच्या कचाट्यात कारचा चक्काचूर; ४ जणांचा जागीच मृत्यू
Accident News : सावळा घाटात मंगळवारी सायंकाळी एक अत्यंत भीषण आणि अंगावर काटा आणणारा अपघात झाला.

Accident News : नाशिक जिल्ह्यातील सावळा घाटात मंगळवारी सायंकाळी अत्यंत भीषण अपघात झाला. उतारावरून येणाऱ्या ट्रकचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने ट्रकने समोरील इको कारला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे कार पुढे असलेल्या दुसऱ्या ट्रकमध्ये घुसली आणि दोन ट्रकांच्या कचाट्यात सापडून कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. (Accident News)
मिळालेल्या माहितीनुसार, पेठ-दिंडोरी हद्दीतील सावळा घाटात इको कार उतारावरून जात असताना मागून येणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेल झाले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने कारला जोरदार धडक दिली. धडकेचा वेग इतका प्रचंड होता की कार थेट समोरील ट्रकच्या मागील भागावर आदळली. (Accident News)
या भीषण अपघातात कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आणखी एका जणाचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा चार झाला असून एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. (Accident News)
अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने हटवून जखमींना बाहेर काढण्यात आले. (Accident News)
या अपघातामुळे सावळा घाटातील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी वाहने बाजूला करून काही तासांच्या प्रयत्नांनंतर वाहतूक सुरळीत केली. (Accident News)
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, अपघाताचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. (Accident News)
Accident News : तेलंगणामध्ये भीषण अपघात ! 4 शेतजमुरांचा दुर्दैवी मृत्यू
Accident News : काळाचा घाला! तीर्थयात्रेला निघालेल्या भाविकांचा भीषण अपघात






