Accident News : तेलंगणामध्ये भीषण अपघात ! 4 शेतजमुरांचा दुर्दैवी मृत्यू
दोन वेळच्या अन्नासाठी, कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा म्हणून शेकडो किलोमीटर दूर तेलंगणात (Accident News) गेलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील मजुरांवर नियतीने क्रूर घाला घातला.

Accident News : दोन वेळच्या अन्नासाठी, कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा म्हणून शेकडो किलोमीटर दूर तेलंगणात (Accident News) गेलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील मजुरांवर नियतीने क्रूर घाला घातला. सिंदेवाही तालुक्यातील पवना चक गावातील मजुरांच्या वाहनाला तेलंगणातील रामगुंडम येथे झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर २७ मजूर गंभीर जखमी झाले.
या दुर्घटनेमुळे पवना चक गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. अतुल सोनुले (४५), अर्चना सोनुले (४०), प्रभा मोहुर्ले (५६) आणि रंजना शेंडे (५०) अशी मृतांची नावे आहेत. या मृतांमध्ये तीन महिलांचा (Accident News) समावेश असल्याने गावातील अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सिंदेवाही तालुक्यातील पवना चक गावातील हे सर्व मजूर दरवर्षीप्रमाणे यंदाही भात रोवणीच्या हंगामी कामासाठी तेलंगणा राज्यात गेले होते.
गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दिवसभराची कष्टाची मजुरी आटोपून ते आपल्या निवासस्थानी परतत असताना रामगुंडम परिसरात त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. अपघाताचा (Accident News) जोर इतका जबरदस्त होता की घटनास्थळीच चार मजुरांचा मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले. या जखमींना रामगुंडम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.






