पीडीसीसी जिल्हा निवड बुद्धीबळ स्पर्धा : अन्वी, शाळवी, इरा, निहिरा, अनुष्का यांना विजेतेपद

पुणे – पुणे जिल्हा बुद्धीबळ सर्कल (पीडीसीसी) यांच्या वतीने आयोजित पीडीसीसी जिल्हा ७,९,११,१३, १७ वर्षाखालील
निवड बुद्धीबळ स्पर्धेत अन्वी हिंगे, शाळवी चास्कर, इरा बोहरा, निहिरा कौल, अनुष्का कुतवळ यांनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.
कर्वे रोड येथील अश्वमेध हॉल आणि श्री गणेश सभागृह या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत ७ वर्षाखालील मुलींच्या गटात अन्वी हिंगेने अनैका अग्रवालचा पराभव करून ५ गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला. ९ वर्षाखालील गटात शाळवी चास्करने डेलीया खैरनारचा ५ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला.
११ वर्षाखालील मुलींच्या गटात इरा बोहरा हिने प्रांजल राउतचा पराभव करून ५ गुणांसह विजेतेपद पटकावले. १३ वर्षाखालील मुलींच्या गटात निहिरा कौलने चतुर्थी परदेशीचा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. १७ वर्षाखालील मुलींच्या गटात अनुष्का कुतवळने निहारिका सावरकरला पराभुत करून विजेतेपदाला गवसणी घातली.
T20 Ranking (Batting) : टीम इंडियाच्या जैस्वालची क्रमवारीत यशस्वी अन् मोठी झेप…
स्पर्धेतील विजेत्यांना खेळाडूंना करंडक व रोख रकमेची अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण आयएम अभिषेक केळकर, विवेक भागवत, पीडीसीसीचे उपाध्यक्ष प्रकाश कुंटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयए चीफ आरबीटर विनिता श्रोत्री, श्रद्धा विंचूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.




