Yashasvi Jaiswal T20 Ranking : टीम इंडियाच्या टी-20 मालिका जिंकल्यानंतर आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. टीम इंडियाचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालला याचा खूप फायदा झाला आहे. तो T20 क्रमवारीत पहिल्या 10 मध्ये पोहोचला आहे. इंदूरमध्ये झालेल्या सामन्यात यशस्वीने शानदार अर्धशतक झळकावले होते. यशस्वीने क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. त्याला 7 स्थानांचा फायदा झाला आहे. टीम इंडियाने अलीकडेच टी-20 मालिकेत अफगाणिस्तानचा 3-0 असा पराभव केला आहे.
सूर्यकुमार यादव टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. त्याला 869 रेटिंग मिळाली आहे. इंग्लंडचा फिलिप सॉल्ट दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवान तिसऱ्या तर बाबर आझम चौथ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू एडन मार्करम पाचव्या क्रमांकावर आहे. यशस्वी सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याला 7 स्थानांचा फायदा झाला आहे. भारतीय फलंदाज रुतुराज गायकवाड 9व्या स्थानावर आहे. त्याची एका स्थानानं घसरण झाली आहे.
टीम इंडियाने टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला. या सामन्यात यशस्वी सलामीला आला होता. त्याने 34 चेंडूंचा सामना करत 68 धावा केल्या. यशस्वीने 5 चौकार आणि 6 षटकार मारले होते. त्याचा स्ट्राईक रेट 200 होता.
याआधीही यशस्वीने टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी केली आहे. त्याने 17 टी-20 सामन्यात 502 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने एक शतक आणि 4 अर्धशतके झळकावली आहेत. यशस्वीने देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली आहे. इंडियन प्रीमियर लीगमुळे तो खूप प्रसिद्ध झाला.