District Open Selection Chess Tournament : आठ खेळाडूंना संयुक्त आघाडी…

District Open Men’s and Women’s Selection Chess Tournament – 25 मार्च 2024:बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित व पुणे जिल्हा बुद्धीबळ सर्कल (पीडीसीसी) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या पीडीसीसी जिल्हा खुल्या पुरुष व महिला निवड बुद्धीबळ स्पर्धेत चौथ्या फेरीअखेर खुल्या गटात अविरत चौहान, गौरव झगडे, आदित्य गद्रे, विरेश शरणार्थी, अभिजीत जोशी, प्रथमेश शेरला,ओम लामकाने, अद्विक अगरवाल यांनी ४ गुणांसह संयुक्तरीत्या आघाडी प्राप्त केली आहे.
कर्वे रोड येथील अश्वमेध हॉल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत चौथ्या फेरीत खुल्या गटात १७७७ रेटिंग असलेल्या अविरत चौहानने २१०६ रेटिंग असलेल्या गौरव बाक्लीवालचा पराभव करून ४ गुण प्राप्त केले. तर, गौरव झगडेने शेजल संजयचा, आदित्य गद्रेने शंतनु मिराशीचा पराभव करून ४ गुण मिळवले. विरेश शरणार्थीने अर्णव कदमवर विजय मिळवत ४ गुणांची कमाई केली.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/ipl-2024-the-wait-is-over-schedule-of-remaining-ipl-matches-released-know-when-and-where-the-final-will-be-played/
याआधी स्पर्धेचे उदघाटन मेजर ध्यानचंद पुरस्कार विजेत्या ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त प्रकाश कुंटे आणि पीडीसीसीचे खजिनदार चंद्रकांत मोकाशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयए राजेंद्र शिदोरे चीफ आरबीटर, डेप्युटी चीफ आरबीटर श्रद्धा विंचवेकर आदी उपस्थित होते.





