Satara | राज्यस्तरीय जलदगती बुद्धिबळ स्पर्धा वाईमध्ये उत्साहात

वाई, : एकदिवसीय राज्यस्तरीय खुली जलदगती बुद्धिबळ स्पर्धा वाई येथे नुकतीच उत्साहात झाली. ‘स्वच्छ सर्वेक्षण’, ‘माझी वसुंधरा’ अभियान, वाई नगर परिषद अंतर्गत केया यूथ संस्था व वाई बुद्धिबळ संस्था यांच्यावतीने ही स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेत मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बुलडाणा, पाचगणी, महाबळेश्वर, फलटण, बारामती आदी ठिकाणांहून 260 स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय मानांकित खेडाडूंचा समावेश होता.
खुल्या गटात सातारच्या अनिकेत बापटने 8 पैकी 7.5 गुणांसह अजिंक्यपद पटकवले. कोल्हापूरचा श्रीराज भोसले उपविजेता ठरला. प्रशासक तथा मुख्याधिकारी संजीवनी दळवी, कार्यालय अधीक्षक नारायण गोसावी, योगेश गाडे, विजय पिसाळ, अभिजित दळवी, राजेंद्र कोंडे, वैभव राजपूत, शीतलसिंह डाळवाले, विशाल गायकवाड यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी केया यूथ संस्थेचे सचिन कामटे, राजू सकुंडे, रेश्मा दळवी, श्री बुद्धिबळ क्लबचे श्रीकांत अडसूळ, समीर ढेकाणे, अथर्व जाधव, वाई नगर परिषदेचे शिवराज परमार, परेश लाड, संजय शेटे यांनी सहकार्य केले.





