Sharjah Masters chess tournament 2024 : भारतीय ग्रँडमास्टर अरविंद चिदंबरमनं स्पर्धेत घेतली आघाडी…
Updated On:

Sharjah Masters 2024 (Chess) : – भारतीय ग्रँडमास्टर अरविंद चिदंबरमने शारजाह मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत पाचव्या फेरीत स्थानिक खेळाडू एआर सालेह सालेमचा पराभव करून एकेरी आघाडी घेतली आहे. त्याच्यानंतर चार खेळाडू दुसऱ्या स्थानावर आहेत ज्यात इराणचा अमीन तबताबाई आणि बर्दिया दानेश्वर आणि अमेरिकेचा हॅन्स मोके नेइमन आणि सॅम शँकलँड यांचा समावेश आहे.
अव्वल मानांकित अर्जुन एरिगेसी इतर आठ खेळाडूंसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारताच्या संकल्प गुप्ताचाही यामध्ये समावेश आहे. शारजाह मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत अजून चार फेऱ्या बाकी आहेत.
सोळा खेळाडू तीन गुणांसह पुढे आहेत. एरिगे आणि वोलोदार मुर्झिन यांचा सामना अनिर्णित राहिला तर संकल्पने अझरबैजानच्या तैमूर रझदाबोव्हला बरोबरीत रोखले. अभिमन्यू पुराणिक यांचा इराणच्या तबताबाईकडून पराभव झाला.





