Mohsin Naqvi Statement : “भारतही आयर्लंडकडून हरला होता, मग…?”; पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर मोहसिन नक्वींचे अजब वक्तव्य
Mohsin Naqvi Statement : पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी पाकिस्तानच्या पराभवानंतर भारत-दक्षिण आफ्रिकेबद्दल केलेलं वक्तव्य व्हायरल होत आहे.

Mohsin Naqvi Bizarre Defence Pakistan Test Series Loss To England Mentions India Ireland Defeat : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पत्करावा लागलेला लाजिरवाणा पराभव आणि दौऱ्याच्या मध्यातच ७ खेळाडूंसह संपूर्ण सपोर्ट स्टाफची तडकाफडकी केलेली हकालपट्टी, यावरून चहूबाजूंनी कोंडीत सापडलेले पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) यांनी स्वतःचा अजब बचाव केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये नक्वी यांनी पाकिस्तानच्या सुमार कामगिरीचे समर्थन करण्यासाठी चक्क भारत आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघांचे हास्यास्पद दाखले दिले आहेत. (Mohsin Naqvi Statement)
“भारत आयर्लंडकडून हरला, मग तिकडे क्रिकेट संपले का?”; नक्वींचा अजब युक्तिवाद! (Mohsin Naqvi Statement)
आपल्या निर्णयांचे समर्थन करताना मोहसीन नक्वी म्हणाले, “मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, दक्षिण आफ्रिका नामिबियाकडून हरली आणि भारतही आयर्लंडकडून पराभूत झाला होता, मग तिकडे क्रिकेट संपले का? जर एखादा खेळाडू कामगिरी करत नसेल, तर आम्ही काय करणार? ज्या खेळाडूंची गरज असेल, त्यांनाच आम्ही संघात संधी देणार. आमच्यासाठी प्रत्येक सामना आणि मालिका अत्यंत महत्त्वाची आहे.” त्यांच्या या विधानानंतर क्रिकेट जगतातून नक्वींच्या बुद्धिमत्तेवर तीव्र टीका केली जात आहे.
Mohsin Naqvi’s message to critics. 🗣️
“South Africa lost to Namibia, and India also lost to Ireland. Does that mean their cricket is over? No team becomes a champion overnight. Pakistan have already improved from 9th to 6th in T20Is & 8th to 5th in ODIs”. pic.twitter.com/EsIqZXy3py
— Salman. (@TsMeSalman1_) September 3, 2026
सलमान अली आघाच्या हकालपट्टीवर सारवासारव! (Mohsin Naqvi Statement)
🔴INDIA ALSO LOST TO IRELAND – SO IS THEIR CRICKET OVER?🤯
Mohsin Naqvi🎙️: South Africa lost to Namibia, and India also lost to Ireland. Does that mean their cricket is over? No team becomes a champion overnight. Pakistan have already improved – from 9th to 6th in T20Is and from… pic.twitter.com/Def42ZLImA
— Sam (@cricsam02) September 3, 2026
दौऱ्याच्या मध्यातून पाकिस्तानात परत पाठवण्यात आलेल्या अष्टपैलू सलमान अली आघाच्या मुद्द्यावर नक्वी यांनी सारवासारव केली. ते म्हणाले की, कोणालाही बाहेर काढणे हा आमचा हेतू नसतो. आघा हा चांगला खेळाडू आहे, परंतु सध्यातरी त्याला लय गवसलेली नाही. कामगिरी होत नसेल, तर संघात बदल करणे अनिवार्य ठरते. कसोटी मालिकेतील कामगिरीवर प्रश्न विचारले जात असताना नक्वी यांनी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील प्रगतीचा पाढा वाचण्यास सुरुवात केली.
कसोटीतील वाताहतीवर रँकिंगचा बचाव; नऊ वर्षांपासून आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ – (Mohsin Naqvi Statement)
गेल्या ९ वर्षांपासून पाकिस्तानला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही, या वास्तवाकडे दुर्लक्ष करत नक्वी यांनी रँकिंगचे आकडे पुढे केले. “माझ्या कार्यकाळात क्रिकेट उद्ध्वस्त झाल्याचे म्हणणाऱ्यांनी जुनी आकडेवारी तपासावी. आमचे नवे व्यवस्थापन आले तेव्हा संघ वन-डेत ८ व्या स्थानावर होता, आज ५ व्या स्थानावर आहे. टी-२० मध्ये संघ ९ व्या क्रमांकावरून ६ व्या स्थानावर आला आहे,” असा दावा त्यांनी केला. मात्र, कसोटीतील ऐतिहासिक पडझडीवर त्यांनी कोणतीही ठोस उपाययोजना मांडली नाही.





