Rohit Sharma Retirement : “लॉर्ड्सवर निवृत्ती घेणार का?”; निवड समितीच्या मेसेजने संतापला होता हिटमॅन; रागात घेतला होता मोठा निर्णय!
Rohit Sharma Retirement : लॉर्ड्सवरील सामन्यादरम्यान रोहितला थेट निवृत्ती घेण्यास सुचवण्यात आले होते आणि रागाच्या भरात तो तयारही झाला होता.

Rohit Sharma ODI Retirement Controversy BCCI Review Meeting World Cup 2027 : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळणार की नाही, यावरून सुरू असलेला वाद आता शिगेला पोहोचला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिल्यानंतर बीसीसीआयने भविष्याचा वेध घेत रोहितकडून वनडेचे कर्णधारपद काढून शुबमन गिलकडे सोपवले होते. दरम्यान, लॉर्ड्सवरील सामन्यादरम्यान रोहितला थेट निवृत्ती घेण्यास सुचवण्यात आले होते आणि रागाच्या भरात तो तयारही झाला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आल्याने क्रिकेट वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
निवड समिती सदस्याचा थेट मेसेज; लॉर्ड्सवर निवृत्तीसाठी रोहित झाला होता तयार –
पीटीआयने (PTI) दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय निवड समितीतील एका सदस्याने रोहितला संघ व्यवस्थापनाच्या भविष्यातील योजनांची स्पष्ट कल्पना दिली होती. संघ आता रोहितशिवाय पुढे जाण्याचा विचार करत असून लॉर्ड्सवरील तिसऱ्या वनडेनंतर तू निवृत्ती जाहीर करणार का, अशी विचारणा त्या सदस्याने केली होती. या अनपेक्षित संवादाने रोहित शर्मा प्रचंड संतापला आणि त्याने रागाच्या भरात तडकाफडकी निवृत्ती जाहीर करण्यास होकारही भरला होता, असा मोठा दावा या वृत्तात करण्यात आला आहे.
मुंबईत बीसीसीआयची महाबैठक; गंभीर, आगरकर, गिल आणि अय्यर आमनेसामने – (Rohit Sharma Retirement)
Rohit Sharma Was Angry But Agreed’: Report Drops ‘Retirement’ Bombshell pic.twitter.com/vQo16r9gHn
— RVCJ Sports (@RVCJ_Sports) September 3, 2026
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात अत्यंत महत्त्वाची आढावा बैठक (Review Meeting) पार पडत आहे. या बैठकीला मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर, दोन्ही कर्णधार शुबमन गिल व श्रेयस अय्यर, सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सचिव देवजित सैकिया उपस्थित आहेत. इंग्लंड-आयर्लंड दौऱ्यातील कामगिरीचे मूल्यमापन करण्यासोबतच २०२७ च्या वनडे वर्ल्डकपच्या रोडमॅपवर या बैठकीत सखोल मंथन सुरू आहे.
२०२७ च्या विश्वचषकात रोहित खेळणार का? आज होणार अंतिम फैसला – (Rohit Sharma Retirement)
कसोटी आणि टी-२० मधून आधीच निवृत्त झालेला रोहित शर्मा २०२७ च्या वनडे वर्ल्डकपचा भाग असणार की त्याला अधिकृतपणे निरोप दिला जाणार, यावर या बैठकीनंतर बीसीसीआय ठोस भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. ३९ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या रोहितच्या फिटनेसवर आणि भविष्यातील भूमिकेवर गंभीर-आगरकर जोडी काय निर्णय घेते, याकडे अवघ्या क्रीडा विश्वाचे डोळे लागले आहेत.





