कराची – पाकिस्तान क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीची ( Shahid Afridi ) पाकिस्तानचा अंतरिम मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याने मोहम्मद वसीम अब्बासी यांची जागा घेतली आहे. या बातमीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पाकिस्तान क्रिकेटमध्ये काही दिवसांपूर्वी मोठे फेरबदल होताना दिसत आहेत.
INDvsBAN | भारतीय संघ मारणार मिरपूरचे मैदान? विजयासाठी 100 धावांची गरज
दोन दिवसांपूर्वीच रमीज राजा यांच्या जागी नजम सेठी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवीन अध्यक्ष बनले होते. अशात संघाचा मुख्य निवडकर्ता बदलण्यात आला आहे. आफ्रिदी ( Shahid Afridi ) निवडकर्त्यांच्या अंतरिम समितीचे नेतृत्व करेल. ज्यात माजी खेळाडू अब्दुल रज्जाक, राव इफ्तिकार अहमद आणि हारून रशीद यांचा समावेश आहे. आफ्रिदी आणि हारून दोघेही क्रिकेट व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत.
विकत घ्यायला ती वस्तू आहे का? रहाणेचा फोटो शेअर करत शरद पोक्षेंनी व्यक्त केला संताप
सध्या न्यूझीलंड संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळण्यात येणार असून या मालिकेला सोमवारपासून प्रांरभ होणार आहे. खरं तर, पाकिस्तानला मायदेशात इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत 0-3 ने पराभव पत्करावा लागला होता. या लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये एकच खळबळ माजली होती.
त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये सातत्याने बदल होताना दिसत आहेत. दरम्यान, शाहीन आफ्रिदी आणि शाहीद आफ्रिदी ( Shahid Afridi ) यांच्यात खास नाते आहे. शाहीन हा आफ्रिदीच्या मुलीचा होणार पती आहे. त्यांचा साखरपुडाही झाला आहे. अशात आफ्रिदीकडे मुख्य निवडकर्त्याचे पद आल्यामुळे हे सासरे-जावयाची ही जोडी पाकिस्तान क्रिकेटला उंचीवर नेण्याचा प्रयत्न करेल.