विकत घ्यायला ती वस्तू आहे का? रहाणेचा फोटो शेअर करत शरद पोक्षेंनी व्यक्त केला संताप

आयपीएल २०२३ हंगामासाठीचा मिनी लिलाव कोच्ची येथे पार पडला. हा लिलाव नावाने मिनी होता मात्र, खेळाडूच्या किमतीवरून बिग लिलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. कारण आयपीएल लिलावाच्या इतिहासातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी बोली लागल्याचे पाहायला मिळाले. इंग्लडच्या सॅम कुरनला पंजाब किंग्ज संघाने अवघ्या १८ कोटी ५० लाख रुपयांची बोली लावण्यात आली. त्याचबरोबर कॅमेरून ग्रीन, बेन स्टोक्स, निकोलस पूरन आणि हॅरी ब्रूक्स या खेळाडूंसाठीही संघांनी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केलाय.
IPL 2023 Auction | बस चालकाचा मुलगा खेळणार आयपीएल; राजस्थानने लावली ‘एवढी’ बोली
भारताच्या अजिंक्य राहणेची मागील काही काळापासून आयपीएलमधील कामगिरी अत्यंत खराब राहिलेली आहे. त्यामुळे यानन्दाच्या लिलावात त्याला कोणताही संघ खरेदी करण्याच्या नादात पडणार नाही असे म्हटले जात होते. मात्र, चेन्नई सुपर किंग्ज संघाने त्याला त्याची मूळ किंमत असलेल्या ५० लाखांत आपल्या संघात घेतले आहे. दरम्यान, लिलावाच्या बातम्यानंतर रहाणेचा एक फोटो शेअर करत अभिनेते शरद पोंक्षे यांनी संताप व्यक्त केलाय.
IPL 2023 Auction | बस चालकाचा मुलगा खेळणार आयपीएल; राजस्थानने लावली ‘एवढी’ बोली
शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर कायम सक्रिय राहतात आणि ते नेहमीच त्याचे प्रखर मत व्यक्त करत असतात. राजकीय तसेच धार्मिक मुद्द्यावरून शरद पोंक्षे हे त्यांच्या प्रतिक्रियांमुळे अनेकवेळा चर्चेत राहिले आहेत. त्याचबरोबर त्यांना कित्येकदा नेटकऱ्यांच्या टिकेचाही सामना करावं लागला आहे. दरम्यान, पोंक्षे यांनी आयपीएल लिलावाबाबतच्या वृत्तावरून माध्यमावर टीका केली आहे.
दळीद्री पत्रकारीता.विकत घ्यायला ती वस्तू आहे का? तो खेळाडू आहे त्याच ते मानधन आहे.लाज कशी वाटत नाही? अशी बातमी देताना? आणि हा चौथा स्तंभ pic.twitter.com/rGc9kkzijN
— SHARAD PONKSHE (@ponkshes) December 23, 2022
५० लाखांना चेन्नईने विकत घेतलं अजिंक्य रहाणेला, अशी बातमी एका मराठी वृत्तवाहिनीने दिली होती. याच बातमीचा स्क्रिनशॉट शेअर करत शरद पोंक्षे यांनी संताप व्यक्त केलाय. दळीद्री पत्रकारीता, विकत घ्यायला ती वस्तू आहे का? तो खेळाडू आहे त्याच ते मानधन आहे. लाज कशी वाटत नाही अशी बातमी देताना? अशा शब्दांत पोंक्षेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनंतर काहींनी समर्थन केलय तरी काहींनी या मुद्द्यावरून त्याच्यावर टीका देखील केली आहे.




