Patan News : गावात घुसला गवा अन् उकिरड्यात अडकला; ग्रामस्थांची पळापळ

संजय पाटील
Patan News : पाटण तालुक्यातील येराड गावात बुधवारी सकाळी रानगवा घुसल्याने ग्रामस्थांची चांगलीच धावपळ उडाली. गावातील गणेश हरी साळुंखे यांच्या घराशेजारी असलेल्या उकिरड्यात गवा अडकल्याची घटना पहाटे ग्रामस्थांच्या लक्षात आली आणि बघ्यांची एकच गर्दी जमली.
काहीवेळ गवा घाबरलेल्या अवस्थेत सुटण्याची धडपड करीत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर गव्याने स्वतः प्रयत्न करून सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास उकिरड्यातून बाहेर पडत गावाच्या मुख्य वस्तीकडे धूम ठोकली.
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर शरद पवारांची एका वाक्यात पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र सुदैवाने काही वेळात गवा शेजारील शेतातून डोंगराच्या दिशेने निघून गेला.
दरम्यान, अनेक दिवसांपासून या परिसरात गव्याचा वावर आहे. येथे घरांसह शेती पिकांचे नुकसान करण्यात आले आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.





