SRH vs LSG : पॅट कमिन्सने रचला इतिहास! आयपीएलमध्ये ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला चौथाच खेळाडू

SRH vs LSG Pat Cummins becomes fourth batter in IPL history who hit first 3 balls for a six : पॅट कमिन्स त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी ओळखला जातो पण त्याच्याकडे फलंदाजी करण्याचे कौशल्य आहे. गुरुवारी त्याने आयपीएलमध्ये आपल्या फलंदाजीची क्षमता दाखवली. मात्र, तरी तो आपल्या हैदराबाद संघाला लखनौविरुद्ध विजय मिळवून देऊ शकला नाही. गुरुवारी लखनौविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ४ चेंडूत १८ धावा करत इतिहास रचला आहे. तो या पराक्रमांसह धोनीच्या खास क्लबमध्ये सामील झाला आहे.
पॅट कमिन्सने केला मोठा पराक्रम –
लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात पॅट कमिन्सने फलंदाजीला येताच पहिल्या तीन चेंडूवर सलग तीन षटकार मारले. या सलग तीन मारलेल्या उत्तुंग षटकाराच्या जोरावर त्याने इतिहास रचला आहे. आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे. या एलिट क्लबमध्ये फक्त एकच भारतीय खेळाडू आहे, तो म्हणजे महेंद्रसिंग धोनी. लखनौविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावून १९० धावा केल्या. प्रत्युत्तरात, लखनौ संघाने २३ चेंडू शिल्लक असताना ५ विकेट्स गमावून लक्ष्य गाठले.
पॅट कमिन्सने ठोकले सलग चीन षटकार –
Captain Cummins on the charge! 🚀👍🏻#PatCummins gave #SRH a much-needed lift with a few towering sixes! 🧡💪🏻
Watch LIVE action: https://t.co/f9h0ie1eiG #IPLonJioStar 👉 #SRHvLSG | LIVE NOW on Star Sports 1, Star Sports 1 Hindi & JioHotstar! pic.twitter.com/yhIcOlrWOT
— Star Sports (@StarSportsIndia) March 27, 2025
या सामन्यात हैदराबाद संघाला १९० धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात कर्णधार पॅट कमिन्सच मोठे योगदान होते. पॅट कमिन्स फलंदाजीसाठी आला तेव्हा १७ वे षटक सुरू होते. गोलंदाज शार्दुल ठाकूर होता जो हैदराबादच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवत होता. त्याच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर कमिन्सला पहिल्यांदाच स्ट्राईक मिळाली. त्याने पहिलाच चेंडू पॉइंटच्या षटकारासाठी भिरकावला. यानंतर पुढचा चेंडू ऑफसाईडवर फुल टॉस होता आणि कमिन्सने पुन्हा त्याचे रूपांतर एका उत्तुंग षटकारात केले. यानंतर, कमिन्सला १८ व्या षटकात तिसरा चेंडू खेळण्याची संधी मिळाली.
हेही वाचा – IPL 2025 : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टी वादावर क्युरेटरचा यू-टर्न; म्हणाला ‘जे माझ्यावर आरोप करतायेत, ते…’,
यावेळी गोलंदाज अवेश खान होता. त्याच्या चेंडूवर कमिन्सने शानदार षटकार मारला. अशा प्रकारे त्याने पहिल्या तीन चेंडूंवर सलग तिसरा षटकार मारण्याचा पराक्रम केला. तथापि, पुढच्याच चेंडूवर कमिन्स बाद झाला. अशाप्रकारे, त्याने ४ चेंडूंच्या एका छोट्या डावात १८ धावांचे योगदान दिले.कमिन्सच्या आधी, आयपीएलच्या इतिहासात, तीन फलंदाजांनी क्रीजवर येताच सलग तीन षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे.
हेही वाचा – SRH vs LSG : अनसोल्ड राहिल्यानंतर लखनौ संघात कसा झाला सामील? शार्दुल ठाकूरने सांगितले ‘त्या’ फोन कॉलचे गुपित
हा पराक्रम याआधी कोणी केलाय?
ही कामगिरी पहिल्यांदा केकेआरच्या सुनील नरेनने केली. २०२१ मध्ये आरसीबीविरुद्ध क्रीजवर येताच त्याने सलग तीन षटकार मारले. त्यानंतर २०२३ मध्ये हैदराबादच्या निकोलस पूरनने लखनौविरुद्ध पहिल्या तीन चेंडूंवर तीन षटकार मारले. या क्लबमध्ये सामील होणारा तिसरा फलंदाज चेन्नई सुपर किंग्जचा महेंद्रसिंग धोनी होता. ज्याने गेल्या हंगामात मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ चेंडूत २० धावा केल्या होत्या ज्यामध्ये पहिल्या ३ चेंडूत ३ षटकारांचा समावेश होता. आता या यादीत पॅट कमिन्सचा समावेश झाला आहे.





