SRH vs LSG : शेवटच्या ओव्हरचा थरार अन् पंतचा ‘नाबाद’ प्रहार! लखनौने उघडलं विजयाचं खातं; हैदराबादला घरच्या मैदानावर केलं चारीमुंड्या चित
SRH vs LSG : कर्णधार ऋषभ पंतने एकाकी झुंज देत लखनऊला या हंगामातील पहिला विजय मिळवून दिला.

SRH vs LSG Lucknow super giants win by 5 Wickets : आयपीएल २०२६ च्या १० व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने यजमान सनरायझर्स ५ गडी राखून पराभव केला आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात कर्णधार ऋषभ पंतने एकाकी झुंज देत लखनौला या हंगामातील पहिला विजय मिळवून दिला.
लखनौने उघडले विजयाचे खाते –
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या लखनऊच्या गोलंदाजांनी सुरुवातीलाच हैदराबादला जखडून ठेवले. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादची अवस्था इतकी बिकट होती की १० षटकांत त्यांनी केवळ ३५ धावांत महत्त्वाचे गडी गमावले होते. मात्र, हेनरिक क्लासेन (६२ धावा) आणि नितीश रेड्डी (५६ धावा) यांच्यातील १०० हून अधिक धावांच्या भागीदारीमुळे हैदराबादला ९ बाद १५६ धावांपर्यंत मजल मारता आली.
OVER THE IN-FIELD! 😍
Captain Rishabh Pant guides the chase and finishes it off in style 🤌@LucknowIPL off the mark on the points table +2️⃣
Scorecard ▶️ https://t.co/qC2rF1Hiiz#TATAIPL | #KhelBindaas | #SRHvLSG pic.twitter.com/SEDFsub4UD
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2026
ऋषभ पंतचा मॅच-विनिंग धमाका
Gritty, composed, and leading by example 👏
2️⃣0️⃣th #TATAIPL fifty for the #LSG skipper Rishabh Pant!
The visitors need 13 from last 12 balls
Who is winning this? 🤔Updates ▶️ https://t.co/qC2rF1Hiiz#KhelBindaas | #SRHvLSG pic.twitter.com/7OEeyHLpMy
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2026
प्रत्युत्तरात १५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौची सुरुवातही अडखळत झाली. मिचेल मार्श ३७ धावांवर बाद झाल्यानंतर डावाची सूत्रे ऋषभ पंतने आपल्या हाती घेतली. त्याने एडन मार्करमसोबत (४५ धावा) दुसऱ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली. मार्करम बाद झाल्यावर सामना थोडा रंगतदार वळणावर आला होता, पण पंतने संयम ढळू दिला नाही. त्याने नाबाद ६८ धावांची खेळी करत १९.५ षटकांत संघाला विजय मिळवून दिला.
गोलंदाजीत ‘प्रिन्स’ आणि ‘शमी’ची जादू –
Just a master at work right from the first over 🤌
How good was that spell from Mohd. Shami? 👇
WATCH▶️ https://t.co/i3WtJKa4nw#TATAIPL | #KhelBindaas | #SRHvLSG | @LucknowIPL pic.twitter.com/iJMAkvnB3L
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2026
लखनौकडून मोहम्मद शमी, प्रिन्स यादव आणि आवेश खान यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेत हैदराबादच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. हैदराबादच्या बाजूने हर्ष दुबेने २ गडी बाद करत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण पंतच्या अनुभवापुढे त्यांची डाळ शिजली नाही. सलग दोन पराभवानंतर हैदराबादचा संघ आता दबावाखाली आला असून लखनऊने मात्र विजयाची लय पकडली आहे.





