Pat Cummins Return : मोठी बातमी! सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार बदलणार; इशान किशनच्या जागी ‘हा’ खेळाडू करणार नेतृत्त्व
Pat Cummins Return : आयपीएल २०२६ च्या हंगामात आतापर्यंत संमिश्र कामगिरी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार लवकरच बदलला जाणार आहे.

Pat Cummins SRH Return IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या हंगामात आतापर्यंत संमिश्र कामगिरी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार पॅट कमिन्स आता पूर्णपणे फिट झाला असून तो लवकरच मैदानात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे इशान किशनला कर्णधारपदावून पायउतार व्हावे लागणार आहे.
सनरायझर्स हैदराबादच्या चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. पॅट कमिन्स आपल्या फिटनेस चाचणीसाठी ऑस्ट्रेलियाला गेला होता, जिथे त्याने सर्व चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमिन्स शुक्रवारी १७ एप्रिल रोजी रात्रीपर्यंत संघात सामील होईल. मात्र, चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या १८ एप्रिलच्या सामन्यात तो खेळू शकणार नाही. त्यामुळे या सामन्यात इशान किशन ऐवजी पॅट कमिन्स सनरायझर्स हैदरावादचं नेतृत्त्व करताना दिसू शकतो.
२५ एप्रिलला होणार पुनरागमन –
PAT CUMMINS IS COMING BACK.
He is set to rejoin the SRH squad on Friday.
Sunrisers are targeting April 25 for their captain’s return to the XI.
(Source: Cricbuzz)#IPL2026 pic.twitter.com/bjSxA4Xc3V
— Ministry of Cricket (@MOCricket_) April 17, 2026
व्हिटोरी यांनी स्पष्ट केले की, कमिन्स जरी संघात परतला असला, तरी त्याच्या मॅच फिटनेसाठी आणखी काही दिवसांचा कालावधी दिला जाईल. हैदराबादचा पुढील मोठा सामना २५ एप्रिलला जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे. पॅट कमिन्सने स्वतः सोशल मीडियावर एका चाहत्याला उत्तर देताना २५ एप्रिलच्या सामन्यातून पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे राजस्थान विरुद्धच्या लढतीत हैदराबादची ताकद दुप्पट होणार आहे.
हैदराबादचा राजस्थानवर दबदबा –
याआधी १३ एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा धुव्वा उडवला होता. इशानच्या ९१ धावांच्या जोरावर हैदराबादने २१६ धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर पदार्पण करणाऱ्या प्रफुल्ल हिंगे आणि साकिब हुसेन या युवा गोलंदाजांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेत राजस्थानचा डाव १५९ धावांत गुंडाळला. विशेष म्हणजे, हिंगेने आपल्या पहिल्याच षटकात ३ विकेट्स घेत आयपीएलच्या इतिहासात नव्या विक्रमाची नोंद केली होती. आता कमिन्सच्या परतण्याने गोलंदाजीची बाजू अधिक भक्कम होईल.





